Assembly Election : उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिद्धीकरण बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई

65
Assembly Election : उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिद्धीकरण बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई

सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांनी दिली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर त्यांना त्या गुन्ह्याचे तीन वेळा प्रसिद्धी करणे करणे बंधनकारक असल्याचे ही त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. (Assembly Election)

(हेही वाचा – बँकांमधील मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ची करडी नजर)

२४९ सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघासाठीची तयारी बाबत निवडणूक अधिकारी पडदूने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते. ते म्हणाले, आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी राजकीय कार्यालय, खाजगी जागा आणि शासकीय ठिकाणे या ठिकाणी असलेले राजकीय फोटो, बॅनर हे येत्या ४८ तासांत काढून घ्यावेत असे आवाहन केले. (Assembly Election)

(हेही वाचा – परशुराम महामंडळाच्या अध्यक्षपदी Ashish Damle यांची निवड)

या मतदारसंघात १२ फ्लाईंग स्कॉड फिरतीवर राहतील, कुठे काही घडल्यास शंभर मिनिटाच्या आत कारवाई होईल. उमेदवारी जाहीर होण्यापू्वी काही संभाव्य उमेदवार वाढदिवस, मेळावे साजरे करण्याचे कार्यक्रम होतात त्यावर वॉच राहणार आहे. मतदारसंघात चार ठिकाणी एसएसटी चेक नाके लावत आहोत, तपासणी व्हावी, स्थिर पथक चोवीस तास वाहने तपासतील, अधिकारी, पोलीस व कर्मचारी असतील. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.