Shyam Manav यांचा भाजपाविरोधी प्रचार; ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ सभेत काँग्रेससाठी मागितला पाठिंबा; भाजयुमोने शिकवला धडा

आम्ही फक्त प्रश्न विचारला, त्याचे उत्तर दिले गेले नाही, म्हणून आम्ही घोषणाबाजी केल्याची माहिती भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

272

सरकारच्याच जादूटोणाविरोधी कायद्याच्या अमलबजावणीसंबंधी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी असलेले शाम मानव (Shyam Manav) महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा होताच मूळ रंग दाखवू लागले. लागलीच त्यांनी नागपुरात ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये त्यांनी भाजपविरोधी प्रचार सुरु केला आणि काँग्रेसला पाठिंबा मागितला, असा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन गोंधळ घातला.

नेमके काय घडले?

या कार्यक्रमात आधी दशरथ मडावी  यांनी बोलताना 2014 नंतर संविधान धोक्यात आल्याचा वारंवार उल्लेख केला. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून 2014 नंतरच संविधान कसे काय धोक्यात आले? हे सांगा असा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतरही दशरथ मडावी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी देत व्यासपीठाच्या दिशेने चालत गेले. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळ अडवले. पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अडवले. त्याच वेळेस व्यासपीठाच्या पाठीमागे सभेसंदर्भात लावण्यात आलेला बॅनर एका तरुणाने फाडला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व्यासपीठांसमोर जोरदार घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत भाजयूमोच्या कार्यकर्त्यांना सभागृहाचे बाहेर काढले. (Shyam Manav)

(हेही वाचा Assembly Election 2024 : कुर्ला विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला)

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा आरोप 

आम्ही फक्त प्रश्न विचारला, त्याचे उत्तर दिले गेले नाही, म्हणून आम्ही घोषणाबाजी केल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. श्याम मानव (Shyam Manav) यांच्या सभेत कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातले मुद्दे न सांगता काँग्रेससाठी पाठिंबा मागितला जात आहे असा भाजयुमो कार्यकर्त्यांचा आरोप होता. एवढेच नाही तर काही पक्षांच्या फंडिंगवरही सभा आयोजित केली जात आहे, असा आरोपही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.