माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी वापरलेले शस्त्र अत्याधुनिक होते, गुन्हे शाखेने जप्त केलेल्या अत्याधुनिक शस्त्रमध्ये ऑस्ट्रेलियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल, तुर्की पिस्तूल आणि देशी बनावटीचे पिस्तुलचा समावेश आहे.ही शस्त्र त्यांना शुभम लोणकरच्या मार्फत मोहम्मद जिशान अख्तर याने पुरविली होती अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर येत आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांच्या कुर्ला येथील राहत्या घरापासून काही अंतरावर मिळून आलेली मोटार सायकल पुण्यातून ३२ हजार रुपयांमध्ये मोटार सायकल विकत घेतली होती. गुन्हे शाखेने नुकताच अटक केलेल्या हरीश निषाद याने ही मोटार सायकल विकत घेऊन ती हल्लेखोरांना रेकी करण्यासाठी देण्यात आली होती अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. (Baba Siddiqui)
(हेही वाचा- Assembly Election : उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिद्धीकरण बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई)
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात गुन्हे शाखेने आता पर्यत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात घटनास्थळावरून दोघाना तर एकाला पुण्यातून आणि एकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. या गुन्हयातील मुख्य हल्लेखोर शिवकुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर (Mohammad Zeeshan Akhtar) आणि कटाचा सूत्रधार शुभम लोणकर हे फरार असून या तिघांचा कसून शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम लोणकर (Shubham Lonkar) हा लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) थेट संपर्कात लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची योजना आखली होती. ही योजना मागील तीन ते चार महिन्यापासून आखली जात होती, त्यात मोहम्मद जिशान याने शिवकुमार, धर्मराज आणि गुरमेल यांची यासाठी निवड करून त्यांना पुण्यात शुभम लोणकर कडे कामासाठी पाठवले, शुभम आणि प्रवीण लोणकर (Pravin Lonkar) या बंधूनी या तिघांना यूपीतून नुकताच अटक करण्यात आलेला हरीश निशाद यांच्या पुण्यातील भंगाराच्या दुकानात कामाला ठेवले होते अशी माहिती अटक आरोपीच्या चौकशीत समोर आली. (Baba Siddiqui)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संपूर्ण कट लोणकर बंधूंच्या डेअरी मध्ये शिजला होता. हरीशच्या मार्फत पुण्यातून ३२ हजार रुपये देऊन मोटारसायकल खरेदी करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी च्या हत्येसाठी तुर्की बनावटीच्या अत्याधुनिक पिस्तुलचा वापर झाल्याची पुष्टी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. हे पिस्तूल उत्तर भारतातील गुंडांमध्ये लोकप्रिय असून त्याची किंमत ४ ते ७ लाखांपर्यंत आहे. पोलिसांनी आता पर्यत तीन पिस्तुल जप्त केले आहे त्यात एक देशी बनावटीचे पिस्तुल असून दुसरे ऑस्ट्रेलियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल, तुर्की पिस्तूलचा समावेश आहे. (Baba Siddiqui)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community