Vanchit Bahujan Aghadi: ‘वंचित’ची ३० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी?

182
Vanchit Bahujan Aghadi: ‘वंचित’ची ३० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी?
Vanchit Bahujan Aghadi: ‘वंचित’ची ३० उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; वाचा कोणाला मिळाली उमेदवारी?

विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) पक्षाकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 11 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत 10 उमेदवारांची नावे होती. आता वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 30 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (Vanchit Bahujan Aghadi)

वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. धुळे शहर मतदारसंघासाठी जितेंद्र शिरसाट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ते बौद्ध समाजाचे असल्याचं प्रसिद्धी पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. सिंदखेडा मतदारसंघातून राजपूत समाजाचे भोजासिंग तोडरसिंग रावल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमरेड मतदारसंघातून बौद्ध समाजाचे सपना राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बल्लारपुर मतदारसंघातून कुणबी समाजाचे सतीश मुरलीधर मालेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा-Assembly Election : उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिद्धीकरण बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई)

चिमुर विधानसभा मतदारसंघातून माना समाजाचे अरविंद आत्माराम सदिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. किनवट मतदारसंघातून प्रा. विजय खुपसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते आंध-आदिवासी समाजाचे आहेत. नांदेड उत्तरमधून गौतम दुथडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघातून बौद्ध धर्माचे सुशील कुमार देगलूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाथरी मतदारसंघासाठी विठ्ठल तळेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते माळी समाजाचे आहेत. परतूर – आष्टी मतदारसंघातून माळी समाजाचे रामप्रसाद थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. घनसावंगी येथून कावेरीताई बळीराम खटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा-भारतद्वेष्ट कॅनडाचे पंतप्रधान Justin Trudeau यांचे राजकीय भवितव्य धोक्यात)

जालना येथून डेव्हिड धुमारे, बदनापुर येथे सतीश खरात, देवळाली अविनाश शिदि, इगतपुरी येथे भाऊराव काशिनाथ डगळे, उल्हासनगर येथे डॉ. संजय गुप्ता, अणुशक्ती नगर येथे सतीश राजगुरू, वरळीत अमोल आनंद निकाळजे, पेणमध्ये देवेंद्र कोळी, आंबेगाव मतदारसंघात दिपक पंचमुख, संगमनेर येथे अझीज अब्दुल व्होरा, राहुरी येथे अनिल भिकाजी जाधव, माजलगाव मतदारसंघातून शेख मंजूर चांद, लातुर शहर मतदारसंघातून विनोद खटके, तुळजापूर येथे डॉ. स्नेहा सोनकाटे, उस्मानाबाद येथे प्रणित शामराव डिकले, परंडा मतदारसंघात प्रविण रणबागुल, अक्कलकोट येथे संतोषकुमार खंडू इंगळे, माळशिरसमध्ये राज यशवंत कुमार आणि मिरज मतदारसंघात विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.