Vidhansabha Election 2024 : भाजपने हाती घेतली डॅमेज कंट्रोल मोहीम; रा.स्व. संघाच्या नेत्यांचीही घेतली मदत

116
Vidhansabha Election 2024 : भाजपने हाती घेतली डॅमेज कंट्रोल मोहीम; रा.स्व. संघाच्या नेत्यांचीही घेतली मदत
Vidhansabha Election 2024 : भाजपने हाती घेतली डॅमेज कंट्रोल मोहीम; रा.स्व. संघाच्या नेत्यांचीही घेतली मदत

विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी अद्याप जागावाटप जाहीर केलेले नाही. जागावाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी भाजपने पक्षातील नाराजांची समजूत काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. तिकीट वाटपानंतर नाराजांकडून होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने (BJP) डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली आहे. बंडखोरीचा फटका पक्षाला आणि मित्रपक्षांनाही बसू नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी तीन आघाड्यांवर काम केले जात आहे, असे वृत्त दैनिक ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे. (Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election: ‘या’ दिवशी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; ११० नावांवर शिक्कामोर्तब)

रा.स्व. संघाच्या (RSS) पदाधिकाऱ्यांची यासाठी मदत घेतली जात आहे. जिथे नाराजी होऊ शकते, असे ५२ मतदारसंघ भाजपने काढले आहेत. तिथे नाराजीचा फटका बसू नये, याची काळजी घेतली जात आहे. भाजपच्या वाट्याला येणार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्यांच्यापैकी ज्याला तिकीट नाकारण्याचे ठरले आहे, त्यांना त्या भागातील भाजपचे बडे नेते, संघाचे पदाधिकारी नीट समजावून सांगत आहेत. ज्यांचे तिकीट पक्के झाले, त्यांना तसे सांगण्यात येत आहे. काही नेत्यांना समजावून सांगणे संघ, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कठीण जाते, अशांना मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलावून घेत आहेत. सागर बंगल्यावर चार दिवसांपासून फडणवीस यांनी ‘समजूत अभियान’ हाती घेतले आहे. याअंतर्गत ज्या विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार आहे, तिथे त्या आमदाराला शांत करणे यावर काम केले जात आहे.

थोडेच असे मतदारसंघ आहेत की, जे २०१९ च्या वा आधीच्या निवडणुकीत भाजपकडे होते, पण आता युतीधर्म पाळण्यासाठी ते शिंदेसेना वा अजित पवार गटाला द्यावे लागत आहेत. अशा ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते. ती होऊ नये आणि मित्रपक्षांना मदत व्हावी, हा उद्देश समोर ठेवून ही पावले उचलली जात आहेत. या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव यांनी यासाठी नुकतेच एक बैठक घेतली होती. (Vidhansabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.