सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल

117
सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल
सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल

जर सीमेपलीकडील हालचाली दहशतवाद, अतिरेकवाद व फुटीरतावाद या तीन वाईट कृत्यांवर आधारित असतील तर व्यापार, ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढण्याची शक्यता धूसर होते, असे नमूद करत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकला खडेबोल सुनावले. ते इस्लामाबाद येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २३व्या शिखर संमेलनाला संबोधित करत होते. त्यामुळे पाकिस्तानच्या भूमीवरूनच त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

(हेही वाचा – CJI Chandrachud :१० नोव्हेंबरला संपणार सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ; पत्र लिहून केली ‘या’ नावाची शिफारस)

या वेळी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) व्याप्ती वाढण्याची गरज पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी व्यक्त केली. या शिखर संमेलनाचे अध्यक्ष व पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे उद्घाटनाचे भाषण झाल्यानंतर लगेच जयशंकर यांनी संबोधित केले.

पूर्व लडाखमधील भारत (India) व चीनच्या (China) लष्करामधील तणाव, हिंद महासागर व इतर धोरणात्मक जलक्षेत्रात चीनच्या वाढत्या शक्तीचा मुद्दा उपस्थित करत जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली. तसेच व्यापार व संपर्कापूर्वी प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची गरज व्यक्त केली.

चीनच्या योजनेला भारताचा विरोध

चीनच्या वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) या योजनेला पाठिंबा देण्यास भारताने पुन्हा एकदा नकार दिला आहे. त्यामुळे या योजनेला पाठिंबा न देणारा भारत हा एससीओमधील एकमेव देश ठरला आहे. ओबीओआर ही योजना चीन-पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून (POK) ओबीओआरचा मार्ग जाणार आहे. या गोष्टी व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारताने या योजनेला विरोध केला. (S. Jaishankar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.