IRS Sameer Wankhede ‘या’ पक्षातून विधानसभा लढणार

183
IRS Sameer Wankhede 'या' पक्षातून विधानसभा लढणार
IRS Sameer Wankhede 'या' पक्षातून विधानसभा लढणार

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (IRS Sameer Wankhede) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत. ते महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

(हेही वाचा-Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त)

समीर वानखेडे (IRS Sameer Wankhede) मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

44 वर्षीय समीर वानखेडे (IRS Sameer Wankhede) हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, वानखेडे यांनी अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

(हेही वाचा-Rajshree Munde : धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या गाडीला अपघात; कार अन् ट्रॅव्हल्समध्ये जोरदार धडक)

समीर वानखेडे (IRS Sameer Wankhede) हे छापे, गुप्तचर कारवाया आणि अंमली पदार्थांचे तस्कर आणि त्यांच्या नेटवर्कला लक्ष्य करून गुप्त तपास करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत. आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त त्यांनी जप्त केले आहे.

(हेही वाचा-सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल)

समीर वानखेडे (IRS Sameer Wankhede) यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे यांचं दमदार नेतृत्व आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या अनेक मित्रांची चौकशी केली आहे. अनेक दिवस ते या प्रकरणांमुळे चर्चेत होते.

(हेही वाचा-Assembly Election : उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिद्धीकरण बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई)

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. (IRS Sameer Wankhede)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.