-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटीतील त्रिशतकानंतर इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकने अपेक्षेप्रमाणेच आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. ११ स्थानांची झेप घेत हॅरी ब्रूक दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याच्याबरोबर न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनही संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रयत्नांत हॅरी ब्रूक पहिल्यांदाच विराट कोहलीच्याही (Virat Kohli) पुढे गेला आहे. विराट सध्या सातव्या क्रमांकावर आहे. २५ वर्षीय ब्रूक या घडीला कसोटीतील सगळ्यात लक्षवेधी फलंदाज ठरला आहे. मुलतान कसोटीतील ३१२ धावांसह त्याने कसोटीतील अनेक विक्रमही नावावर केले आहेत. (ICC Test Ranking)
(हेही वाचा- Mangaldas Bandal यांच्या घरावर ईडीची छापेमारी; ८५ कोटींची मालमत्ता जप्त)
इंग्लिश संघाला विजय मिळवून देण्यात जो रुटच्या बरोबरीने त्याने मोलाची कामगिरी केली. शिवाय आधुनिक क्रिकेटमधील शैलीदार कसोटी फलंदाजाची ओळखही त्याने मिळवली आहे. या कसोटीत त्याच्या साथीने ४५० धावांची भागिदारी रचणारा त्याचा ज्येष्ठ साथीदार जो रुटनेही नवीन मापदंड ओलांडला आहे. आयसीसीच्या सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांच्या क्रमवारीत जो रुट पहिल्या विसांत पोहोचला आहे. (ICC Test Ranking)
Widening the gap to his contemporaries, Joe Root is now chasing the game’s greatest-ever with a career-high Test batting ranking 🏏
Details 👉 https://t.co/4pWTQLsuyX pic.twitter.com/N1DSH69FIk
— ICC (@ICC) October 16, 2024
रुटने मुलतान कसोटीत २६२ धावा केल्या. त्याचबरोबर सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे. त्याचबरोबर आयसीसीच्या सर्वकालीन क्रमवारीत त्याचे रेटिंग गुण ९३२ वर पोहोचले आहेत. यापूर्वी त्याचे गुण ९२३ होते. तो आकडा आता त्याने मागे टाकला आहे. या कामगिरीसह तो पहिल्या २० फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. आताच्या घडीला फक्त १६ फलंदाज असे आहेत ज्यांचं रेटिंग ९३० च्या वर आहे. (ICC Test Ranking)
(हेही वाचा- IRS Sameer Wankhede ‘या’ पक्षातून विधानसभा लढणार)
सर्वकालीन क्रमवारीत सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) ९६१ गुणांसह अव्वल आहेत. त्यांना आजतागत कुणी मागे टाकलेलं नाही. त्यांच्यानंतर स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) (९४७), रिकी पोंटिंग (Ricky Ponting) (९४२) आणि विराट कोहली (९३३) हे उजव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत. तर कुमार संगकारा (९३८) आणि मोहम्मद युसुफ (९३३) हे खेळाडूही या यादीत आहेत. (ICC Test Ranking)
मुलतान कसोटीत ब्रूक आणि रुट यांनी ४५४ धावांची भागिदारी केली. त्यामुळे इंग्लिश संघ पाकिस्तानवर मात देऊ शकला. या मालिकेत आता इंग्लिश संघ १-० ने पुढे आहे. (ICC Test Ranking)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community