Arvind Kejriwal यांचा पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर डोळा

117
Arvind Kejriwal यांचा पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर डोळा
  • प्रतिनिधी 

दिल्लीनंतर आता पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण हा राजकीय गोंधळ फेब्रुवारी २०२५ नंतर म्हणजे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. निवडणुकीनंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दिल्लीऐवजी पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा काही प्रख्यात माध्यमांनी केला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे आणि भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची स्थिती पूर्वीसारखी नाही.

(हेही वाचा – Shyam Manav यांचा भाजपाविरोधी प्रचार; ‘संविधान बचाव महाराष्ट्र बचाव’ सभेत काँग्रेससाठी मागितला पाठिंबा; भाजयुमोने शिकवला धडा)

केजरीवाल सांभाळणार राज्याची धुरा ?

आता पक्षाची पकड कमकुवत होत चालली आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकणे आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आता फेब्रुवारी २०२५ मध्ये तेथे निवडणुका आहेत. निकाल काय लागेल हे आताच सांगता येणार नाही. दिल्लीच्या जनतेने त्यांना सत्तेवरून बेदखल केले तर पक्ष काय करणार? अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांची नजर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर आहे. असा दावा एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी केला असल्याचे एका माध्यमाच्या बातमीत म्हटले आहे.

(हेही वाचा – CJI Chandrachud :१० नोव्हेंबरला संपणार सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ; पत्र लिहून केली ‘या’ नावाची शिफारस)

पंजाब हे संपूर्ण राज्य आहे. तेथील पोलीस सरकारच्या अखत्यारीत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था सरकारच्या अखत्यारीत येते. याउलट दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना लोकनियुक्त मुख्यमंत्री असतानाही म्हणावे तेवढे अधिकार नव्हते. केजरीवाल यांनी पंजाबच्या अनेक मंत्र्यांना दिल्लीत बोलावले होते. अखेर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मंत्र्यांना का बोलावले? हा चर्चेचा विषय ठरला होता. तसेच अतिशी यांच्या शपथविधीनंतर झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बोलू दिले नाही, अशीही बातमी सूत्रांनी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात भगवंत मान यांची प्रकृती बिघडली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अरविंद केजरीवाल त्यांना भेटायला गेले नाहीत. मान पंजाबमध्ये पोहोचल्यावर चार मंत्री बडतर्फ करण्यात आले.

(हेही वाचा – सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल)

पाच नवीन मंत्री करण्यात आले. आता प्रश्न असा आहे, की पंजाबमध्ये जे काही घडत आहे, ते काही मोठ्या राजकीय उलथापालथीचे लक्षण आहे का, याशिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे विभव कुमार, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे माजी स्वीय सचिव विभव कुमार यांना पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी सीएम हाऊसमध्ये खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यांची मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, असेही संबंधित बातमीत म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.