BJP मध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकाऱ्याची उपरोधिक ‘X’ post चर्चेचा विषय

136
BJP मध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकाऱ्याची उपरोधिक ‘X’ post चर्चेचा विषय
  • खास प्रतिनिधी 

गेल्या काही वर्षात भाजपामध्ये (BJP) मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्याचे पक्षप्रवेश झाले आणि त्यांना विविध पदे, लोकसभा-राज्यसभा, विधानसभा-विधान परिषदेच्या उमेदवाऱ्या देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली असल्याचे दिसून आले आहे. यांचे पडसाद समाज माध्यमांवरही आता दिसू लागले आहेत. आता ‘पडेल’ उमेदवाराची मानासिक जबाबदारीही घेण्याची तयारी भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी केली आहे.

लोकसभेत फटका

एकीकडे आयात नेते, दुसरीकडे पक्षाच्या नेत्यांना डावलणे, पदांपासून दूर ठेवणे, उमेदवारी नाकारणे यामुळे पक्षांतर्गत नाराजी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी यामुळे मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवाडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपाला (BJP) मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीपूर्वी संघाची नाराजी दूर करण्यात पक्षाला काही प्रमाणात यश आले मात्र जुने कार्यकर्ते-नेते आजही नाराज आहेत.

(हेही वाचा – विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात Aam Aadmi Party ची मागणी माघार ; ‘या’ पक्षाला देणार साथ)

‘सर्वशक्तिनीशी निवडून आणेन हे धर्मकर्तव्य’

भाजपा (BJP) प्रदेश कार्यालयातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने तर X वर एक उपरोधिक पोस्ट केली ती बरीच बोलकी आहे. “मी #शपथ घेतो की २०२४ च्या महाराष्ट्रातील या #विधानसभा निवडणुकीत, मी ज्या विधानसभा मतदारसंघात रहातो, जिथे मी #मतदार आहे तिथे, #महायुती चा/ची उमेदवार, मग तो/ती कोणीही असो, कोण्याही जातीपाती, पंथ, भाषा, धर्माचा/ची असो, त्याला/ तीला सर्वशक्तिनीशी निवडून आणेन हे माझे धर्मकर्तव्य आहे,” अशी ही पोस्ट असून यात पक्षाने डावलले गेल्याची प्रचंड चीड दिसून येत आहे.

बोलक्या प्रतिक्रिया

या पोस्टची चर्चा राजकीय वर्तुळात होत असून त्यावरील प्रतिक्रियाही खूप काही सांगून जात आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे :

(हेही वाचा – Kumar Birla: भारतीय अब्जाधीश कुमार बिर्ला यांच्या कंपनीच्या मालकीचे ७ लोकप्रिय फॅशन ब्रँड तुम्हाला माहित आहेत का?)

“असल्या इमोशनल भंपकपणा असलेल्या पोस्ट टाकू नका तुम्ही भाजप पदाधिकारी आहात आणि वरील पोस्ट ही पक्षाची अप्रत्यक्ष कबुली आहे की लायकी नसलेल्यांनाही भाजप उमेदवारी देणार आहे आणि लोकांनी डोळे मिटून मत द्यावं.”

“काका एवढी निष्ठा दाखवता… आता पर्यंत तुम्ही आमदार झाले पाहिजे होते… आता तुमचा पक्ष उपऱ्याचा झाला आहे… वाईट वाटत तुमची निष्ठा…”

“भारतीय जनता पार्टीने ही वेळ आपल्यावर आणावी हे मोठं दुर्दैव आहे. मला कोणी सांगितले तर मी अशी शपथ घेणार नाही अशी मी शपथ घेतो.”

“हो आणि आयुष्यभर त्या परप्रांतीयांची भांडी घासेन, त्या परप्रांतीयांच्या सतरंज्या उचलेन. साहेब, निष्ठावंत ना तुम्ही, मग तुमच्या नशिबी हेच मिळणार, बाहेरून आलेले भय्ये त्यांच्या सतरंज्या उचलल्या अजून काय हवं हो की नाही.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.