Zakir Naik चा व्हिडिओ पाहून सलमान धर्मांध बनला; हैदराबादच्या मंदिरात घुसून मूर्तीची केली विटंबना

५७ वर्षीय झाकीर अब्दुल करीम नाईक हा इस्लामिक धर्मोपदेशक आहेत. त्याच्यावर द्वेष पसरवण्याचा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

115

मंदिरातील मूर्तीची विटंबना करणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी बुधवारी अटक केली. ही व्यक्ती सोशल मीडियावर इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक (Zakir Naik) आणि अन्य धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहत असे. या प्रचारकांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो कट्टरपंथी झाला आणि मुंबईतही त्याने अशाच घटना घडवून आणल्या आहेत. या व्यक्तीचे वय ३० वर्षे असून आश्चर्याची बाब म्हणजे तो अभियांत्रिकी पदवीधर आहे.

सलमान सलीम ठाकूर उर्फ सलमान असे या व्यक्तीचे नाव आहे. सलमानने सोमवारी सकाळी सिकंदराबाद येथील मुथ्यलम्मा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला आणि मंदिरातील मुख्य मूर्तीची विटंबना केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक, हिंदू संघटना आणि भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले.

(हेही वाचा बविआमध्ये पडली फूट; Hitendra Thakur मविआला देणार पाठिंबा)

लोकांनी केली बेदम मारहाण 

सलमानच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेऊन रुग्णालयात नेले. आरोपीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हैदराबाद पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान सलमान मुंबईचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सलमान सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि जेव्हा आम्ही त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडियावरील मेसेज तपासले तेव्हा आम्हाला कळले की तो झाकीर नाईक आणि इतर इस्लामिक धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहत असे. पोलिसांच्या निवेदनानुसार, इस्लामिक प्रचारकांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान कट्टरपंथी झाला आणि इतर धर्मातील मूर्तीपूजेचा तिरस्कार करू लागला.

झाकीर नाईक कोण आहे?

५७ वर्षीय झाकीर अब्दुल करीम नाईक हा इस्लामिक धर्मोपदेशक आहेत. त्याच्यावर द्वेष पसरवण्याचा आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 2016 मध्ये तो भारतातून पळून गेला. नाईकचा जन्म मुंबईत झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासून तो धार्मिक कार्यात गुंतला आणि नंतर त्याने इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) ची स्थापना केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.