उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गापूजेदरम्यान मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी सर्फराजला पोलिसांनी गोळी मारल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बहराइचमध्ये रविवारी (13 ऑक्टोबर) दुर्गापूजेच्या निमित्ताने मूर्ती विसर्जन यात्रे दरम्यान जातीय हिंसाचार उसळला तेव्हा 22 वर्षीय तरुण राम गोपाल मिश्रा याचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच दगडफेक आणि गोळीबारात सुमारे 6 जण जखमी झाले. दरम्यान आरोपी सर्फराज नेपाळमध्ये जाण्याच्या तयारीत असताना आरोपी सर्फराजला (Accused Sarfraz) पोलिसांनी गोळी मारली. (Bahraini violence)
(हेही वाचा – विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात Aam Aadmi Party ची मागणी माघार ; ‘या’ पक्षाला देणार साथ)
या घटनेनंतर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या जमावाने घरे, दुकाने, रुग्णालये, वाहने इत्यादींना आग लावली. त्यानंतर बहराइच पोलिसांनी अनेक अज्ञात आणि काही नावाजलेल्या व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवले. पोलिसांनी या भागात छापे टाकून आतापर्यंत 55 संशयितांना अटक केली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community