IPL 2025 : लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स कुणाला संघात कायम ठेवणार? रोहितचं काय होणार?

IPL 2025 : मुंबई इंडियन्स ४ खेळाडूंना कायम ठेवणार असल्याचं समजतंय.

47
IPL 2025 : लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स कुणाला संघात कायम ठेवणार? रोहितचं काय होणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये संघ मालक कुठले खेळाडू आपल्याकडे कायम ठेवणार हे ठरवण्याची मुदत आता जवळ आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत संघांना कायम ठेवलेले खेळाडू आयपीएल प्रशासनाला कळवायचे आहेत. त्यानंतर मेगा लिलाव भारताबाहेर पार पडेल. अशावेळी मुंबई इंडियन्स आपल्या खेळाडूंची यादी लवकरच जाहीर करू शकतं. सगळ्यांचं लक्ष असेल ते रोहीत शर्माचं ते करतात यावर. पण, कायम ठेवलेल्या चार खेळाडूंमध्ये रोहित शर्माचं नाव असेल असं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. कायम ठेवलेले इतर तीन खेळाडू असतील ते सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह. दुसरीकडे लखनौ सुपरजायंट्स संघाने अजून के एल राहुलविषयी निर्णय घेतलेला नाही. गेल्या हंगामात संघाच्या खराब कामगिरीनंतर संघ मालक आणि राहुल यांच्यात बिनसलं होतं. (IPL 2025)

मुंबई इंडियन्सनं २०२४ च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. मात्र, मुंबईला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला कायम ठेवल्यास १२० कोटींपैकी ६१ कोटी रुपये खर्च होतील. त्यानंतर ईशान किशनला लिलावातून पुन्हा खरेदी केलं जाऊ शकतं. तर, टीम डेविडसाठी आरटीएमचा पर्याय वापरला जाऊ शकतो अशी माहिती आहे, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. (IPL 2025)

(हेही वाचा – Bahraini violence : बहराइच येथे राम गोपालची हत्या करणाऱ्या आरोपी सर्फराजला पोलिसांनी मारली गोळी)

राजस्थान रॉयल्स कॅप्टन संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि रियान परागला कायम ठेवण्याची शक्यता आहे. तर राजस्थानची जोस बटलरसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे. लखनौ सुपर जाएंटसचा केएल राहुल बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ते आयुष बदोनी, वेगवान गोलंदाज मोहसीन खान, निकोलस पूरनला कायम ठेवण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंत, अक्षर पटेल, कुलदीप यादव या तिघांना आपल्याकडे राखू शकतं. पण, सध्या रिषभ पंत संघ मालकांवर नाखुश असल्याचीही बातमी पसरली आहे. अलीकडेच त्याची फ्रँचाईजीबरोबर बोलणी झाली आहेत. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगला कायम ठेवलं जाईल. याशिवाय शशांक सिंग आणि आषुतोष शर्माला देखील कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे. (IPL 2025)

आयपीएलच्या २०२५ मधील हंगामासाठी सर्व संघांना संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी तयार करायची आहे. पुढील महिन्यात मेगा लिलाव होईल. त्यापूर्वी म्हणजे ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना यादी सोपवावी लागेल. प्रत्येक संघ जास्तीत जास्त ६ खेळाडू आपल्याकडे कायम ठेवू शकतो. यात ५ खेळाडू अनुभवी आणि १ खेळाडू अननुभवी असू शकतो. अर्थात, जेवढे खेळाडू फ्रँचाईजी आपल्याकडे कायम ठेवेल त्या प्रमाणात लिलावासाठी संघांकडे असलेली रक्कम कमी होईल. म्हणजेच पहिल्या खेळाडूसाठी या रकमेतील १८ कोटी रुपये कमी होतील. दुसऱ्या खेळाडूसाठी १४, तिसऱ्या खेळाडूसाठी ११ आणि मग चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी पुन्हा एकदा अनुक्रमे १८ आणि १४ अशी चढी रक्कम आहे. ५ खेळाडूच कायम ठेवले तर सहाव्या खेळाडूसाठी राईट टू मॅच पर्याय संघांना वापरता येईल. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.