Assembly Election 2024 : बंडखोरीची धास्ती, सर्वच पक्ष उमेदवारी शेवटच्या ४८ तासांत घोषित करणार

55
‘या’ मतदारसंघातील उमेदवारी Declare होणार नाही
  • प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दिसलेली राजकीय समीकरणे या पाच वर्षांत पूर्णपणे बदलून गेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट पडले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मधून फुटून निघालेला एक एक गट हा भाजपाबरोबर सत्तेत आहे. तर दुसरा गट हा काँग्रेस बरोबर विरोधी पक्षात आहे. यामुळेच आता तीन-तीन पक्षांची महायुती तसेच महाविकास आघाडी झाली आहे. यामध्ये उमेदवारी कोणत्यातरी एकाच पक्षाला मिळणार आहे आणि त्या भागातील दुसरे इच्छुक हे बंडाच्या मार्गावर असणार आहेत. संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळी स्टॅटर्जी मांडली आहे. उमेदवारी उशिरा घोषित करून बंडखोरांना बंडखोरी करण्यासाठी वेळच मिळू नये असा काहीसा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांचा दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Bahraini violence : बहराइच येथे राम गोपालची हत्या करणाऱ्या आरोपी सर्फराजला पोलिसांनी मारली गोळी)

२०१९ च्या विधानसभा आणि २०२४ च्या विधानसभा यामध्ये बराच बदल झालेला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत जे पक्ष समोरासमोर लढले होते तेच यंदाच्या निवडणुकीत एकत्र निवडणुका लढत आहेत. त्यातच तीन पक्षांची महायुती विरुद्ध तीन पक्षांची आघाडी एकमेकांसमोर लढणार आहे. त्यामुळे एकाच पक्षाला त्या विधानसभा क्षेत्रात उमेदवारी मिळणार असल्याने इतर दोन पक्षातील इच्छुक उमेदवार हे बंडखोरी करू शकतात. याचा विपरीत परिणाम हा महायुती तसेच महाविकास आघाडी दोघांना देखील भोगावा लागू शकतो. म्हणूनच बंडखोरांना पुरेसा वेळ मिळू नये यासाठीच उमेदवारी जाहीर करताना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर करू नये अशा प्रकारची विशेष स्ट्रॅटर्जी आखली जात आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – ‘बंडोबाना थंड’ करण्याचे Mahayuti चे प्रयत्न किती सफल?  )

ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन किंवा तीन प्रबळ दावेदार आहेत, त्या ठिकाणी बंडखोरी होऊ शकते. ज्यांना उमेदवारी नाकारली गेली, त्यांची समजूत काढण्याचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पक्षश्रेष्ठींचे दूत पदाधिकाऱ्यांकडून समजूत काढली जात असल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय, ज्या ठिकाणी बंडखोरी होणार आहे, त्या मतदारसंघात तो किती मते घेईल, त्याचा पक्षाच्या उमेदवाराला किती फटका बसणार, याचेही विश्लेषण केले जात आहे. त्यानंतर पुढील रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.