कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांचा पर्दाफाश झाला आहे. खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा कॅनडाकडे नसल्याचे ट्रूडो यांनी मान्य करून स्वतःचेच आरोप खोटे ठरवले आहे. भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडवण्यास एकटे ट्रूडो जबाबदार आहेत, असे भारताने या कबुलीजबाबावर म्हटले आहे.
कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो बुधवारी, 16 ऑक्टोबर 2024 रोजी कॅनडातील परदेशी हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या समितीसमोर हजर झाले. येथे त्याने कॅनडात होत असलेल्या हेरगिरी आणि हस्तक्षेपाबाबत आपले म्हणणे नोंदवले. यावेळी त्यांनी कॅनडातील भारताच्या हस्तक्षेपाबाबत जुनाच सूर लावला. ट्रुडो यांनी आपल्या वक्तव्यात भारतावर निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला. यासंदर्भात कॅनडाने भारताला कळवल्याचे त्यांनी समितीला सांगितले. पण जेव्हा पुरावे आले तेव्हा खुद्द ट्रुडो यांनी कबूल केले की त्यांनी भारताला कोणतेही सबळ पुरावे दिलेले नाहीत.
(हेही वाचा बविआमध्ये पडली फूट; Hitendra Thakur मविआला देणार पाठिंबा)
ट्रूडो काय म्हणाले?
ट्रूडो म्हणाले, “आम्हाला ही माहिती (निज्जरची हत्या) G-20 च्या आधी सार्वजनिक करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे भारताला खूप कठीण परिस्थितीत आणले गेले असते. पण आम्ही तसे केले नाही. पडद्याआड आम्ही भारताला या मुद्द्यावर सहकार्य करण्याची विनंती करत राहिलो. भारताने आम्हाला विचारले की तुम्हाला काय माहिती आहे, तुमच्याकडे असलेले पुरावे द्या. आम्ही (कॅनडा) सांगितले की ही तुमची (भारताची) एजन्सी आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. पण त्यांनी आम्हाला पुरावे दाखवायला सांगितले. (Canada)
Join Our WhatsApp Community