- ऋजुता लुकतुके
मेटा कंपनी येणाऱ्या दिवसांत मोठी नोकर कपात करणार आहे. व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि रियालिटी लॅब या विभागांमधून ही कपात होणार असल्याचं द व्हर्ज या अमेरिकन वेबसाईटने म्हटलं आहे. कंपनीच्या दीर्घकालीन नियोजनाला अनुसुरून आणि कुठल्या प्रातांमध्ये अधिक गुंतवणूक करायची या धोरणातील बदलांमुळे ही कपात होत असल्याचं रॉयटर्सनेही म्हटलं आहे. ‘आम्ही काही कर्मचाऱ्यांना दुसरीकडे हलवत आहोत. तर जे विभाग आम्ही बंद करतोय त्या विभागातील लोकांना इतर विभागांमध्ये जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सध्या ती प्रक्रिया सुरू आहे,’ असं द व्हर्जशी बोलताना मेटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. (Meta Lay-off)
नेमक्या किती कर्मचाऱ्यांवर यामुळे कुऱ्हाड कोसळणार हे मात्र अजून स्पष्ट नाही. फायनान्शिअल टाईम्सने अलीकडेच एक विचित्र बातमी दिली होती. लॉस एंजलीस इथं कंपनीने २४ जणांना कामावरून काढून टाकलं आहे. याचं कारण काय तर कंपनीने जेवणाचा भत्ता म्हणून दिलेले २५ डॉलर या लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी वापरला म्हणून. या बातमीवर आधीच अमेरिकेत प्रतिक्रिया उमटत आहेत. (Meta Lay-off)
(हेही वाचा – BJP मध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकाऱ्याची उपरोधिक ‘X’ post चर्चेचा विषय)
या कारवाईचा सध्याच्या नोकर कपातीशी काहीही संबंध नाही असंही फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्राने स्पष्ट केलं आहे. मेटाकडून कंपनीची पुनर्रचना होत असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. पण, नेमकी माहिती अजूनही कंपनीने दिलेली नाही. नोव्हेंबर २०२२ मध्ये मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी २०१३ हे वर्ष कार्यक्षमतेचं वर्ष म्हणून जाहीर केलं होतं. कंपनीची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पुनर्रचना आणि विभागवार बदल करण्यावर त्यांचा भर होता आणि तेव्हापासून कंपनीतून २१,००० लोकांना काढून टाकण्यात आलं आहे. (Meta Lay-off)
मेटा कंपनीचा शेअर मात्र अमेरिकन शेअर बाजारात वधारला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर ६० टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीचे कंपनीचे निकालही अपेक्षेपेक्षा चांगले असून त्याचाही परिणाम शेअरवर झाला आहे. मेटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीही वाढत असल्यामुळे कंपनीचा महसूल पुढील वर्षभरात चांगलाच असेल असा अंदाज आहे. (Meta Lay-off)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community