काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी 

127
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी 
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एका आमदारावर पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर सतत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskarkhoskar) यांना पक्षातून निलंबित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून खोसकरांच्या निलंबनाचं पत्र देण्यात आलं आहे. (Hiraman Khoskarkhoskar)

क्रॉस व्होटिंग (Hiraman Khoskarkhoskar, Cross voting) केल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित (Hiraman Khoskarkhoskar, Suspended) केले आहे. याच आमदार खोसकर यांनी केलेल्या आरोपाने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आता या प्रकरणाला आमदार खोसकर यांनी वेगळे वळण दिले आहे. आपण आदिवासी आमदार आहोत. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणीवपूर्वक आपला छळ केला. गेल्या अडीच महिने याबाबत विविध प्रकारे त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : बंडखोरीची धास्ती, सर्वच पक्ष उमेदवारी शेवटच्या ४८ तासांत घोषित करणार)

पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्याला उमेदवारी देण्यास तयार होते, असा दावा देखील आमदार खोसकर यांनी केला. ते म्हणाले, मी सातत्याने प्रदेशाध्यक्ष पटोले (Nana Patole) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नाना पटोले त्यांच्या भेटीसाठी भंडारा येथे देखील गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला उमेदवारी दिली जाईल, असा शब्द दिला होता. मात्र नंतर मला पक्षातून निलंबित केले गेले. अडीच महिने विविध प्रकारे मला त्रास दिला जात होता. असा आरोप आमदार हिरामण खोसकर यांनी केला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.