‘या’ मतदारसंघातील उमेदवारी Declare होणार नाही

92
‘या’ मतदारसंघातील उमेदवारी Declare होणार नाही
  • खास प्रतिनिधी 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल १५ ऑक्टोबर २०२४ ला वाजले आणि सगळ्याच पक्षांनी ‘जोर-बैठकां’चा धडाका सुरू केला. गुरुवारी १७ ऑक्टोबरला महाविकास आघाडीची मुंबईतील सोफीटेल हॉटेलमधील बैठक सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपलीच नाही. या विधानसभा निवडणुकीत सात ते आठ प्रमुख राजकीय पक्ष असून बंडखोरीही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. (Declare)

.. तर पुढचे दार ठोठावायचे

ही बंडखोरी टाळण्यासाठी आणि बंडोबाना शांत करण्यासाठी महायुतीने तडकाफडकी विविध महामंडळांवर २७ नेत्यांची वर्णी लावली खरी, पण त्यातील किती शांत होतील, ही शंकाच आहे. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतही बंडखोरांची संख्या कमी नाही. एका पक्षाने तिकीट नाकारले की लगेच दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जायचे, त्यांनी नाही म्हटले की पुढचे दार ठोठावायचे, अशी परिस्थिती अनेक इच्छुक उमेदवारांची झाली आहे, जणू काही राज्यात होणारी ही विधानसभा निवडणूक शेवटचीच आहे.

(हेही वाचा – Meta Lay-off : मेटाकडून येणाऱ्या दिवसांत मोठी नोकर कपात)

बंडोबांचे काय? हा खरा प्रश्न..

युती आणि आघाडीकडून अद्याप कोणता पक्ष किती जागा लढणार, हे धोरण निश्चित झालेले नाही. ते झाल्यावर प्रत्येक पक्ष आपापली उमेदवार यादी जाहीर करतील. मात्र बहुतांश प्रमुख पक्षांनी काही वादग्रस्त जागा वगळता उमेदवारी निश्चित केली आहे, तर वादग्रस्त किंवा बंडखोरीची शक्यता मोठ्या प्रमाणावर असलेल्या जागांचे कसे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. (Declare)

शेवटच्या दिवशी अर्जदारांची भाऊगर्दी

यावर उपाय म्हणून काही उमेदवाऱ्या अंतिम क्षणी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवस आधी, जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नाराज नेत्यांची समजूत काढूनही वाद न मिटलेल्या जागांवरील उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत उघड न करता ठरलेल्या उमेदवाराला थेट ए-बी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली नाही तरी काही मतदारसंघात शेवटच्या दिवशी अर्ज भरणाऱ्यांची भाऊगर्दी पाहावयास मिळणार, हे नक्की. (Declare)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.