Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत

174
Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत
Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत

विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly election) येत्या नोव्हेंबर महिन्यात घोषित करण्यात आली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही कंबर कसून तयारीला लागले आहेत. मात्र राजकीय पक्षाचा अद्याप ही जागा वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाहीये. सध्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचा वांद्रे पूर्व मतदारसंघातील (Bandra East Constituency) उमेदवार ठरला आहे. झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्याविरोधात शिवसेना उबाठा गटाचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) निवडणूक लढणार आहेत. याबाबत बुधवारी उबाठा गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी एका मेळाव्यात घोषणा केली. (Maharashtra Assembly election)

वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा केली आहे. अनिल परब म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारी त्यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

(हेही वाचा – Corporation appointments : राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या ; महायुतीच्या ‘या’ नेत्यांना आता मिळणार कॅबिनेटचा मंत्रीपदाचा दर्जा)

दरम्यान, झिशान सिद्दिकी यांनी २०१९ साली कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवत आमदार म्हणून निवडणून आले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता झिशान सिद्दिकी हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झिशान सिद्दिकी जर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले तर त्यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. असे झाल्यास वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दिकी अशी लढत वांद्रे पूर्व मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी )

जागावाटपासाठी बैठका सुरू

दरम्यान, दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपासाठी बैठकांचे सत्रव सुरू आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत २१६ जागांवर एकमत झालं आहे. तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मविआ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील हे उपस्थित आहेत. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी बैठक सुरू आहे. त्यात मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती मिळली आहे.  

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.