Lawrence Bishnoi Gang चा महाराष्ट्र कमांडर शुभु लोणकर?

166
Assembly Election : बिश्नोई टोळीच्या दहशतीमुळे यंदाच्या निवडणूक प्रचारातून बॉलिवूड सेलिब्रिटी गायब
  • प्रतिनिधी 

लॉरेंस बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi Gang) महाराष्ट्र राज्याची धुरा पुण्यातील शुभु लोणकरच्या खांद्यावर देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी शुभु लोणकरने यशस्वीपणे पार पाडल्यानंतर शुभु लोणकरला बिश्नोई टोळीकडून टोळीचा महाराष्ट्र प्रमुख बनविल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुभु लोणकर हा भारताच्या बाहेर पळून गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याच्या विरुद्ध लूक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात आली आहे.

शुभु लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट गावाचा आहे, सध्या त्याने पुण्यात आश्रय घेतला होता. शुभम उर्फ शुभु हा प्रवीण लोणकर भावासह पुण्यात राहण्यास होता. त्या ठिकाणी प्रवीण लोणकर हा दूध डेअरी चालवत असून शुभु त्याला कामात मदत करीत होता. १६ जानेवारीला शस्त्र तस्करीच्या एका गुन्ह्यात अकोट पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. याच प्रकरणात शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर या दोघांना पुण्यातल्या वारजे परिसरातून अटक केली होती. शुभम लोणकर पिस्तूल पुरवत असल्याचे समोर आले होते. त्याची जामिनावर सुटका झाली होती. पण, त्यावेळी केलेल्या चौकशीमध्ये शुभम लोणकरच्या मोबाईलमध्ये लॉरेंस बिश्नोईसोबतचे (Lawrence Bishnoi Gang) दोन व्हिडिओ कॉल आणि काही ऑडिओ कॉल सापडले होते. त्यामुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्यानंतर फक्त तपासासाठी या दहाही आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. आठ आरोपींची चौकशी केली, मात्र शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर हे दोघे बंधू मिळून आले नव्हते, दोघेही फरार झाले होते.

(हेही वाचा – Corporation appointments : राज्य सरकारकडून २७ महामंडळांवर नियुक्त्या ; महायुतीच्या ‘या’ नेत्यांना आता मिळणार कॅबिनेटचा मंत्रीपदाचा दर्जा)

दरम्यान ‘शुभु लोणकर महाराष्ट्र’ या फेसबुक खात्यावरून पोस्ट व्हायरल झाली होती, त्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi Gang) स्वीकारल्याचे म्हटले होते. या पोस्ट नंतर शुभु हा मुंबई पोलिसांच्या रडारवर पुन्हा आला, मुंबई गुन्हे शाखेने शुभु चा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. प्रवीण लोणकर याला या प्रकरणात अटक करण्यात आली. शुभु लोणकर हा लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या थेट संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे, शस्त्र पुरवठा करण्यासाठी शुभुची या टोळीने यापूर्वी मदत घेतली होती. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी शुभु याच्यावर देण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या अभिलेखावर असलेला मोहम्मद जिशान अख्तर हा लॉरेंस बिश्नोई टोळीकडून शुभुला मदत करण्यासाठी नेमला होता. मोहम्मद जिशान अख्तर याने उत्तर प्रदेश, हरियाणा येथून हल्ल्यासाठी शूटर्स एकत्र केले आणि त्यांना पुण्यात शुभुकडे पाठविले. शुभुने धर्मराज, गुरमेल, आणि शिवकुमार यांना भंगार विक्रेता हरीश निशाद याच्याकडे कामाला ठेवले होते.

पुण्यातील प्रवीण लोणकरच्या डेअरीत हत्येची सर्व योजना आखण्यात आली होती. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी शुभु हा पुण्यातुन गायब झाला. शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला आणि शिवकुमार या मुख्य शूटरने धर्मराज आणि गुरमेलची साथ सोडून पोबारा केला, त्यानंतर शिवकुमार हा गुढरीत्या बेपत्ता झाला असून त्याचे शेवटचे लोकेशन पनवेल येथे दाखविले गेले, त्यानंतर शिवकुमार याचे लोकेशन पोलिसांना मिळू शकले नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेंस बिश्नोई टोळीची (Lawrence Bishnoi Gang) महाराष्ट्रातील जबाबदारी शुभम उर्फ शुभु लोणकर याच्यावर टाकली आहे.

(हेही वाचा – काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी )

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) हा पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील धत्तरानवाली गावचा रहिवासी आहे. लॉरेंस बिश्नोई याचे खरे नाव सतविंदर सिंग आहे. १२ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेला लॉरेंस बिश्नोई याचे वडील हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल होते. लॉरेन्सने अबोहरमध्ये १२ वीपर्यंत शिक्षण घेतले आणि २०१० मध्ये चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिकत असताना लॉरेन्सची एका मुलीशी मैत्री झाली, जी पुढे प्रेमात बदलली. लॉरेंसने पंजाब विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी त्याला अटक केली होती.

लॉरेंस (Lawrence Bishnoi) विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाला आणि पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा (SOPU) अध्यक्ष झाला. कॅनडातील कॅननमध्ये बसून गोल्डी ब्रार लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीची कमान घेतात. लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. लॉरेंस बिश्नोईचे ११ राज्यामध्ये नेटवर्क आहे, त्याच्या टोळीचे ७०० शूटर आहेत, पाकिस्तानातही लॉरेन्स बिश्नोई टोळीची दहशत आहे.

लॉरेंस बिश्नोई टोळीचा शूटर पाकिस्तानात देखील असून लॉरेन्स बिश्नोई दाऊद इब्राहिमला मागे टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळी सतविंदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार चालवतो जो कॅनेडियन पोलीस आणि भारतीय एजन्सीच्या यादीत हवा आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात हे सर्व खुलासे केले आहेत. NIA ने लॉरेंस बिश्नोई टोळीच्या १६ गुंडांविरुद्ध UAPA अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.