CM Yogi Adityanath बनले गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ; किती गुंडांना ठार केले जाणून घ्या…

2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मन्सूर पहेलवानचा पहिला एनकाउंटर झाला होता. यानंतर पोलिसांनी अनेक कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला. यातील अनेक एन्काउंटरवर प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत.

228
एकेकाळी उत्तर प्रदेशात गल्लोगली बाहुबली, गुंड होते, या राज्यात पोलिसांची कमी या गुंडांचीच दहशत होती, पण जसे योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मुख्यमंत्री झाले, तसे त्यांनी आधी या गुंडांना यमसदनी पाठवून राज्यात कायद्याचे राज्य आणले, हे करत असताना त्यांनी सर्व जाती-धर्मातील गुंडांचा सफाया केला. बहराइच मध्ये राम गोपाल मिश्रा या हिंदुत्वनिष्ठ तरुणाची मुसलमानांनी निर्घृण हत्या केली. त्यानंतर राम गोपाल मिश्रा यांचे आई-वडील यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन सगळा घटनाक्रम सांगितला. त्यावर मुखमंत्री योगी यांनी, न्याय मिळवून दिला जाईल’, असा शब्द दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा खून करणाऱ्या दोन मुसलमान आरोपींना गजाआड केले, त्यांना पकडताना थेट त्यांच्यावर गोळ्याच झाडल्या, त्या आरोपींच्या पायाला लागल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री योगी आता थेट बंदुकीचा भाषा करत आहे, हे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचारातील आरोपी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्या त्यांच्या पायावर लागल्या, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि उत्तर प्रदेशातील पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री योगी गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार न्याय करत आहेत. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात मन्सूर पहेलवानचा पहिला एनकाउंटर झाला होता. यानंतर पोलिसांनी अनेक कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला. यातील अनेक एन्काउंटरवर प्रश्नही उपस्थित केले गेले आहेत.

मुख्यमंत्री योगींच्या कार्यकाळात किती झाल्या चकमक? 

20 मार्च 2017 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार यूपी पोलिसांनी एकूण 12 हजार 964 चकमकींची माहिती दिली आहे. यामध्ये 207 संशयित गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून 27 हजार 117 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या चकमकीत 1 हजार 601 गुन्हेगार जखमीही झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सरासरी दर 13व्या दिवशी एका  गुन्हेगाराशी चकमक झाली आहे. या चकमकीत फक्त गुन्हेगारच मारले गेले नाही, तर 17 पोलीसही हुतात्मा झाले आहेत. याशिवाय, हजारो पोलीस जखमीही झाले आहेत. योगी सरकारच्या (CM Yogi Adityanath) काळात मारल्या गेलेल्या गुन्हेगारांवर 75 हजार रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चकमकीत मारल्या गेलेल्या गुन्हेगारांची जातजातीनिहाय गुन्हेगारांवर नजर टाकली, तर या चकमकीत मुस्लिम गुन्हेगार 67, ब्राह्मण 20, ठाकूर 18, यादव 16, दलित 14, एसटी 3, शीख 2, इतर ओबीसीतील 8 गुन्हेगार मारले गेले आहेत. याशिवाय इतर जाती-धर्मातील एकूण 59 गुन्हेगार मारले गेले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.