Rani Baug : राणीबागेत आता वाहने उभी केल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

425
Rani Baug : राणीबागेत आता वाहने उभी केल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (Rani Baug) वाहनांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली असून सध्या आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे जिथे दुचाकीला पाच रुपये मोजावे लागत होते, तिथे आता ३० रुपये मोजावे लागणार असून चारचाकी वाहनांना २० रुपयांच्या तुलनेत ८० रुपये मोजावे लागणार आहे.

राणीबागेत (Rani Baug) येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय यापूर्वी सन २००९ मध्ये घेण्यात आला होता. परंतु मागील सुमारे १५ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नसून सध्या या प्राणिसंग्रहायाचे रुप पालटले गेल्याने हे ठिकाण पर्यटकांचे पसंतीचे बनले आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज १५ ते २० हजार पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. तर सुट्टीच्या दिवशी हा ३५ हजारांवर पोहोचला जातो. या पर्यटकांपैंकी बहुतांश लोक हे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन येतात तसेच शाळांच्या सहली येत असल्याने येथील वाहनतळाची सुविधा अपुरी पडत असतात.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : घाटकोपर पश्चिमसाठी शिवसेनेकडे चांगला उमेदवार असल्यास भाजपा करणार जागेची अदलाबदली)

सध्या असलेल्या वाहनतळाच्या जागेत फक्त १०० ते १२० वाहने उभी करता येतात. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात अतिरिक्त वाहनतळाच्या सुविधेची मागणी केली जात आहे. सध्या पहिल्या तासाकरता वाहन शुल्क आकारले जात असले तरी वेळेची मर्यादा नसल्याने दुचाकी वाहनांना पर्यटकांना पाच रुपये आणि चारचाकी वाहनांना २० रुपये शुल्क भरावे लागत होते, पण आता पहिल्या तीन तासांकरता शुल्क निश्चित करून पुढील प्रत्येक तासांकरता शुल्क आकारले जाणार आहे. (Rani Baug)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्राणिसंग्रहालय फिरण्याकरता एक तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि वाहने एक तासांपेक्षा जास्त वेळ येथे पार्क केली जातात, त्यामुळे प्राणिसंग्रहालयात पार्किंगकरता किमान पहिल्या तासांकरता एकच शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या तीन तासांनंतर प्रत्येक वाढीव शुल्क आकारण्यात येणार आहे. वेळेची मर्यादा किमान तीन तासासाठी ठेवल्याने वाहनांची रहदारी नियमित करता येईल. तसेच एकाच वेळी येणारा वाहनतळावरील ताण कमी होईल आणि यामुळे होणारा पर्यटकांची गैरसोय टाळता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. (Rani Baug)

(हेही वाचा – पुन्हा Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले)

प्राणिसंग्रहालयातील वाहनतळाचे दर

दुचाकी सध्याचे दर : पाच रुपये

दुचाकी वाढीव दर (पहिल्या तीन तासांकरता) : ३० रुपये (पुढील तासांना १० रुपये)

चारचाकी सध्याचे दर : २० रुपये

चारचाकी वाढीव दर (पहिल्या तीन तासांकरता) : ८० रुपये (पुढील तासांना ३० रुपये)

बस सध्याचे दर : ४० रुपये

लहान बस वाढीव दर (पहिल्या तीन तासांकरता) १२० रुपये (पुढील तासांना ४० रुपये)

बस सध्याचे दर : ४० रुपये

मोठी बस वाढीव दर (पहिल्या तीन तासांकरता) १५० रुपये (पुढील तासांना ५० रुपये)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.