- प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून, त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती भाजपाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी गुरुवारी (१७ ऑक्टोबर) दिली.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : घाटकोपर पश्चिमसाठी शिवसेनेकडे चांगला उमेदवार असल्यास भाजपा करणार जागेची अदलाबदली)
भाजपाच्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह १८ महत्त्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.
(हेही वाचा – पुन्हा Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले)
भाजपाच्या कार्यकाळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आल्याने राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या ५४ वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरिकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community