Rajawadi Hospital च्या नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा, कंत्राटदाराची नेमणूक

354
Rajawadi Hospital च्या नवीन इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा, कंत्राटदाराची नेमणूक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

पूर्व उपनगरांतील राजावाडी रुग्णालयावरील (Rajawadi Hospital) वाढलेला रुग्णांचा ताण लक्षात घेता या रुग्णालयाच्या जागेचा पुनर्विकास करून नवीन रुग्णालय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तळ घर, तळ मजल्यासह १० मजल्यांची इमारत बांधली जाणार असून यासाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. तब्बल १०२० खाटांचे ही रुग्णालय बांधले जाणार आहे.

घाटकोपर पूर्व येथील सेठ व्ही. सी. गांधी आणि एस. ए. व्होरा महापालिका राजावाडी रुग्णालयातील (Rajawadi Hospital) सध्याचे बांधकाम पाडून त्यावर नवीन रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय पहिल्या टप्प्यात घेतला आहे. महापालिकेचे सल्लागार आणि महापालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागाने बनवलेल्या आराखड्यानुसार राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास हा अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम अर्थात ईपीसी तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत)

या बांधकाम आराखड्यानुसार खालचे तळघर अधिक वरचे तळघर अधिक तळमजला अधिक १० मजल्यांचे बांधकाम अशाप्रकारे ३४ हजार ४५७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर हे बांधकाम केले जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये शायोना कॉर्पोरेशन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या इमारत बांधकामासाठी विविध करांसह ६६५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Rajawadi Hospital)

या इमारत बांधकामामध्ये विद्युत प्रणालीची कामे, सीसी टिव्ही, पीए प्रणाली, इंटरनेट, टेलिफोन नेटवर्कींग आणि प्रवेश नियंत्रण अशाप्रकारे एलव्हीची कामे, एचव्हीसीची कामे, मॉडयुलर ऑपरेशन थिएटर, मेडिकल गॅस पाईपलाईन प्रणाली, अग्निरोधक प्रणाली, केंद्रीय निर्जुंतकीकरण सेवा प्रणाली, वायवीय ट्युब प्रणाली, नर्स कॉल प्रणाली आदींचा समावेश आहे. (Rajawadi Hospital)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.