Salman Khan च्या कटातील शार्प शूटर सुखाला पानिपतमधून अटक

48
Salman Khan च्या कटातील शार्प शूटर सुखाला पानिपतमधून अटक
Salman Khan च्या कटातील शार्प शूटर सुखाला पानिपतमधून अटक
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचा कुख्यात शार्पशूटर सुखबीर बलबीर सिंग उर्फ ​​सुखा याला गुरुवारी पहाटे नवीमुंबई पोलिसांनी पानिपत येथून अटक केली. कुख्यात शार्पशूटर सुखा हा बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) हत्येच्या कथित कटातील प्रमुख संशयितांपैकी एक आहे, सुखा हा अनेक गुन्ह्यामध्ये वाँटेड आहे.
सलमान खानवर (Salman Khan) हल्ला करण्याच्या योजनेतील  एक भाग म्हणून त्याने खानच्या पनवेल फार्महाऊसची तपासणी केली होती. सलमान खानची त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर हत्या करण्याच्या अयशस्वी कटाच्या तपासादरम्यान सुखाचे नाव समोर आले होते. नवी मुंबई पोलिसांनी पानिपत न्यायालयातून दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवली आणि सुखाला पुढील तपासासाठी मुंबई आणण्यात येत आहे.
सलमान खानच्या जीवाची किंमत २५ लाख रुपये …….
नविमुंबई  पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) टोळीने सलमान खानला जीवे मारण्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी दिली होती असे तपासात उघड झाले आहे.ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान सलमान खानच्या हत्येची योजना आखल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे,जवळपास ६० ते ७० जण सलमान खानच्या मुंबईतील घर, पनवेल फार्महाऊस आणि गोरेगाव फिल्म सिटी येथे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचेही  तपासात उघड झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या कटात सुखाचा सहभाग शस्त्र पुरवठा करण्याच्या पलीकडे आहे. (Salman Khan)
तपास अधिकारी यांनी  खुलासा केला की सुखा हा  या कटात अटक करण्यात आलेला सहावा संशयित आहे आणि याआधी पकडलेल्या इतर पाच जणांमध्ये सामील आहे. १८ ते २० वयोगटातील अंदाजे १७ शार्प शूटर सोबत तरुणांच्या सुखा सामील होता, हे सर्व सलमान खानच्या  संपवण्याच्या या भीषण योजनेचा भाग होते. (Salman Khan)
आरोपपत्रानुसार, ऑगस्ट  २०२३ ते एप्रिल २०२४  दरम्यान हा कट रचला गेला. अत्याधुनिक शस्त्र मिळवण्यात सुखाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांनी उघड केले. या टोळीने पाकिस्तानकडून AK-47, AK-92, M16 रायफल्स आणि तुर्की बनावटीची झिगाना पिस्तुल, ज्याचा वापर  पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येसाठी करण्यात आला होता ही अत्याधुनिक शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न सुखाने केला होता. (Salman Khan)
तपासात असेही आढळून आले की सुखाने हत्येचे काम शार्पशूटर अजय कश्यप उर्फ ​​एके आणि या कटात सहभागी असलेल्या इतर चार जणांना सोपवले होते. कश्यप आणि त्याच्या टीमने सलमान खानच्या फार्महाऊसची तपासणी केली आणि अभिनेत्याच्या सुरक्षा उपायांचे काळजीपूर्वक पाहणी केली होती, खानच्या  कडेकोट सुरक्षा आणि बुलेटप्रूफ वाहनांमुळे हत्येसाठी उच्च दर्जाची शस्त्रे आवश्यक असतील असे त्यांनी ठरवले होते. (Salman Khan)
पुढील तपासात सुखाचा पाकिस्तानस्थित शस्त्रास्त्र विक्रेता डोगरशी थेट संबंध उघड झाला. शस्त्रास्त्र कराराची वाटाघाटी करताना सुखाने डोगरशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला, एक AK-47 आणि इतर प्रगत शस्त्रे शालमध्ये गुंडाळली. डोगरने शस्त्रे पुरवण्याचे मान्य केले, सुखाने ५०% आगाऊ आणि उर्वरित ५० % भारतात डिलिव्हरी केल्यावर देण्याचे वचन दिले. (Salman Khan)
नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, या टोळीने अनमोल बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ), गोल्डी ब्रार, कश्यप, भाटिया, चीना आणि जावेद खान यांच्यासह १५ ते १६ सदस्य असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे त्यांच्या  हत्येचे  नियोजन केले होते, सर्व शूटर गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई यांच्या निर्देशांची वाट पाहत होते. हा आदेश मिळाल्यावर सलमान खानवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून तस्करीची शस्त्रे वापरण्याचा त्यांचा इरादा होता. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या अभिनेत्याला मारण्याच्या इराद्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर हत्येचा कट उधळला गेला. सुखाचे लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) यांच्याशी जवळचे संबंध असल्याबद्दल पोलिसांना सतर्क करण्यात आले, ज्यामुळे प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली.   (Salman Khan)
सुखाने  या नावाखाली सोशल मीडिया खाते उघडल जिथे तो सक्रिय असायचा नियमितपणे शस्त्रांसह चित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करत असे. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर 1,022 फॉलोअर्स आणि 1,290 पोस्ट्स होत्या, त्यामुळे सुखा हा नवीमुबई पोलिसांच्या रडारवर आला होता.  (Salman Khan)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.