बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. ट्रॅफिक कंट्रोल रुमला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितलं आहे. सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.(Salman Khan)
… तर बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट अवस्था होईल
मुंबई वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला असून, लॉरेन्स बिश्नोईशी (Lawrence Bishnoi) असलेले दीर्घकालीन वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे (Salman Khan) 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की, तो सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे, त्यासाठी त्याने पैसे मागितले आहेत आणि जर पैसे दिले नाही, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे. (Salman Khan)
ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ‘ही धमकी हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचे असेल, तर त्याला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल.’ आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Salman Khan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community