Ind vs NZ, 1st Test : ४६ धावांच्या नीच्चांकावर ऑस्ट्रेलियाने भारताला असं डिवचलं

72
Ind vs NZ, 1st Test : ४६ धावांच्या नीच्चांकावर ऑस्ट्रेलियाने भारताला असं डिवचलं
Ind vs NZ, 1st Test : ४६ धावांच्या नीच्चांकावर ऑस्ट्रेलियाने भारताला असं डिवचलं
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघ बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ४६ धावांतच गुंडाळला गेला. सोशल मीडियाने तर त्यावर तोंडसुख घेतलंच. पण, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही भारतीय संघाला डिवचण्याची संधी सोडली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तर ट्विटरवरच उघडपणे भारताची खिल्ली उडवली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. दोघांमध्ये ५ कसोटींची मालिका होणार आहे. बोर्डर – गावसकर चषकासाठी होणारी ही मालिका आहे. २०१४ पासून हा चषक भारताकडेच आहे. त्यामुळे दोन संघांमधील वैर लक्षात घेता ऑल्ट्रेलियाने एक प्रकारे भारतीय संघावर शेरेबाजीच केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटरवरच ही बातमी दिली आहे. आणि शेरा मारलाय की, ‘४६ हे आता ३६ च्या बरोबरीचे झाले आहेत.’ (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप)

२०२० मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना ॲडलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांमध्ये सर्वबाद झाला होता. त्याचीच आठवण एकप्रकारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने करून दिली आहे. (Ind vs NZ, 1st Test)

 भारतीय संघ बंगळुरू कसोटीत आता पिछाडीवर पडला आहे. न्यूझीलंडकडे पहिल्या डावात दीडशेहून अधिक धावांची आघाडी आहे. भारतीय संघाची मायदेशातील ही नीच्चांकी कसोटी धावसंख्या ठरलीय. भारताचे ५ फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाले. यात विराटही शून्यावरच बाद झाला. तर भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली ती रिषभ पंतची २०. त्याशिवाय यशस्वी जयसवालने १३ धावा केल्या. बाकीचे फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Ind vs NZ, 1st Test : रोहित शर्माने मान्य केली बंगळुरू कसोटीतील ती चूक )

न्यूझीलंडसाठी मॅट हेन्रीने ५ तर ओरूकने ४ बळी मिळवले. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानावर असला तरी न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटींनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे ५ कसोटींची मालिका आहे. परदेशी खेळपट्टीवर भारताला विजय मिळवणं कठीण जातं त्यामुळे मायदेशात विजय मिळवणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आयसीसी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अंतिम फेरीतील जागा पक्की होऊ शकते. (Ind vs NZ, 1st Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.