- ऋजुता लुकतुके
सणासुदीच्या काळात भाजी आणि फळांच्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. कांद्यांचे दर वाढताना दिसताच केंद्राने अतिरिक्त साठा म्हणजेच बफर स्टॉक बाहेर काढण्याचं ठरवलं आहे. कांद्याचा मोठा उत्पादन प्रदेश लासलगावहून केंद्राने कांदा थेट दिल्लीला मागवला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून एक कांदा एक्स्प्रेस रेल्वे दिल्लीला रवाना झाली आहे. महाराष्ट्रातील १६०० टन कांदा घेऊन ही रेल्वे २० ऑक्टोबरला दिल्लीच्या किशनगंज रेल्वे स्थानकात पोहोचेल. अशाप्रकारे अख्खी रेल्वे गाडी भरून एखाद्या शेतमालाची वाहतूक करण्याचा हा देशातील पहिलाच प्रसंग आहे. मूळातच सध्या उत्तरेत कांद्याचे भाव चढे आहेत आणि तिथे अतिरिक्त सरकारी साठ्यातील कांदा ३५ रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. (Onion Express Train)
(हेही वाचा – Ind vs NZ, 1st Test : ४६ धावांच्या नीच्चांकावर ऑस्ट्रेलियाने भारताला असं डिवचलं)
सरकारला आशा आहे की, या पुरवठ्यामुळे दिल्लीमध्ये किमती स्थिर राहण्यास मदत होईल. विविध शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ भाव ७५ रुपये किलोवर पोहोचले आहेत. लखनौ, वाराणसी आसाम, नागालँड मणिपूरसह उत्तर-पूर्व राज्यांमध्ये अशीच व्यवस्था केली जाईल. तोटा कमी करण्यासाठी ‘सीलबंद कंटेनर’ वाहतुकीसाठी लॉजिस्टिक्स कंपनी कॉनकॉर्डशीही सरकार चर्चा करत आहे. घाऊक भाव कमी करण्यासाठी सध्याच्या बाजारभावानुसार कांद्याचा लिलाव करण्यात येणार आहे. एका कांदा एक्सप्रेस रेल्वेत ५६ ट्रकमध्ये मावतील इतके कांदे मावतात. शिवाय प्रवासही कमी वेळेत होतो. वाहतुकीचा खर्चही १७ टक्क्यांनी कमी होतो. (Onion Express Train)
(हेही वाचा – Central Railway वर तब्बल २२ तासांचा पॉवर ब्लॉक; कोणत्या ट्रेन रद्द?)
५ सप्टेंबरपासून, सरकार मोबाईल व्हॅन, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया दुकाने, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, मदर डेअरी यांच्या माध्यमातून अनुदानित दराने कांदा विकत आहे. शिवाय सरकारी मोबाईल व्हॅनही शहरांमधून फिरत आहेत. आता ही योजना दिवाळीच्या काळातही सुरूच राहील. ८६,००० टन कांदा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मणिपूरसह विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र हे देशातील मुख्य कांदा उत्पादक राज्य आहे. आणि तिथून चांगली आवक असल्यामुळे यंदा कांद्याचे भाव हाताबाहेर जाणार नाहीत, असा अंदाज आहे. (Onion Express Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community