Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ

Gold Prices : दिवाळीच्या काही दिवस आधी सोनं ७९,४५० रुपयांवर पोहोचलं आहे. 

115
Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ
Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ
  • ऋजुता लुकतुके 

दसऱ्याला काही काळ कमी झालेल्या सोन्याच्या किमती दिवाळीला पुन्हा वाढल्या आहेत. आता सोनं ८०,००० प्रती १० ग्रॅमच्या उंबरठ्यावर उभं आहे. सध्या सोन्याचे दर ७९,४५० रुपयांच्या जवळपास आहेत. (Gold Prices)

इस्रायल आणि हमास युद्धाची तीव्रता वाढल्याचा परिणाम आहेच. शिवाय सणासुदीच्या दिवसांतही लोकांचा ओढा मौल्यवान धातूंकडे वाढत आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे दर वाढत आहेत.  (Gold Prices)

(हेही वाचा- Women’s T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात, द. आफ्रिकन महिलांनी केला ८ गडी राखून पराभव)

गेल्या महिना भरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी जळगावच्या सुवर्ण नगरीमध्ये सोन्याच्या दराने नव्याने उच्चांकी पातळी गाठली असून जीएसटीसह सोन्याचे दर ७९,४५० इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात दिवाळी सारखा सण पाहता,अजूनही सोन्याचे दर वाढू शकणार असल्याचा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. (Gold Prices)

दिल्ली –  ७८,०५०
मुंबई – ७७,९००
अहमदाबाद – ७७,९५०
कोलकाता – ७७,९००
लखनऊ – ७८,०५०
बेंगलुरु – ७७,९००
जयपुर – ७८,०५०
पटना – ७७,९५०
हैदराबाद – ७७,९००
भुवनेश्वर- ७७,९०० 

देशभरात शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ७,६७१ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत ७,४८७ रुपये प्रति ग्रॅम तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ६,२१४ रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे. आज देशभरात चांदीची किंमत ९६,८०० रुपये प्रति किलोग्राम आहे. मात्र, दिवाळी सणाआधी सोन्याचे भाव वाढतील, असे जाणकारांचे अंदाज आहेत. (Gold Prices)

 शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जाहीर केले जात नाहीत. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.  (Gold Prices)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.