Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक

59
Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक
  • प्रतिनिधी 

खार पोलिसांनी शिक्षणतज्ञ आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. अख्तर हसन रिझवी यांची ५२ लाखांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी एका कथित वकीला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिझवी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कथित वकिलाने फसवणुकीच्या (Fraud) रकमेतील २४ लाख परत केले असून उर्वरित रक्कम मागू नये अन्यथा त्यांची गोपनीय माहिती उघड करेल अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण न्यायालयातून खार पोलिसांकडे आले असून “आम्ही त्यानुसार कथित वकील असणाऱ्या व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे”, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.

(हेही वाचा – Women’s T20 World Cup : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात, द. आफ्रिकन महिलांनी केला ८ गडी राखून पराभव)

तक्रारदार अख्तर हसन रिझवी हे माजी राज्यसभा खासदार होते तसेच एका शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. २०११ मध्ये रिजवी यांची कथित आरोपी यांच्यासोबत ओळख झाली होती. त्याने स्वत:ची ओळख समीर भोगानी अशी केली होती. त्याने कथितपणे दावा केला की तो एक प्रसिद्ध वकील आहे आणि रिझवी यांना सांगितले की तो न्यायालयात त्यांच्या खटला बघेल. त्याने रिझवी यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्रही दाखवले. रिझवी यांनी भोगानी यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांबाबत मूळ कागदपत्रे आणि इतर तपशीलांसह माहिती त्यांच्याशी शेअर केली. त्यानंतर भोगानी यांनी रिझवी यांच्याकडून विविध बाबींसाठी कायदेशीर शुल्क म्हणून ५२ लाख घेतल्याचा आरोप आहे परंतु प्रत्यक्षात त्यांनी न्यायालयात कायदेशीर उत्तर दाखल केले नाही किंवा वकील म्हणून हजर झाले नाही. रिझवी यांनी पोलिसांना सांगितले की, भोगानी यांनी त्यांचे वकालतनामा (कायदेशीर दस्तऐवज जे वकिलाला न्यायालयात क्लायंटचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार देते) दाखल केले नव्हते. (Fraud)

(हेही वाचा – Airline Hoax Threats : खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचं होतंय एवढं नुकसान)

रिझवी याना काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागल्यानंतर, त्याने आपल्या एका मित्राच्या वकिल मुलाला भोगानींची चौकशी करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला पत्र पाठवले. बार कौन्सिलने उत्तर दिले की समीर भोगानी नावाचा कोणताही वकील त्यांच्याकडे नोंदणीकृत नाही, असे रिजवी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर रिझवी यांनी भोगानी यांना त्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. भोगानी यांनी २४ लाख परत केले आणि उर्वरित रक्कम जुलै २०२३ पर्यंत देण्याचे आश्वासन दिले. तथापि, नंतर त्याने कथितपणे रिझवीच्या पत्नीला फोन केला आणि सांगितले की जर त्यांनी २८ लाख रुपयांची उर्वरित रक्कम माफ केली तरच तो त्यांना सर्व गोपनीय माहिती आणि मूळ कागदपत्रे परत करेल. त्यांनी पूर्तता न केल्यास त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला कागदपत्रे देण्याची धमकी दिली आणि नंतर कागदपत्रे परत करण्यासाठी आणखी १५ लाखांची मागणी केली, असे रिजवी यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर रिझवी यांनी भोगानी यांच्याविरोधात वांद्रे न्यायालयात खटला दाखल केला; न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे, १५ ऑक्टोबर रोजी भोगानी यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला, असे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. “गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू आहे असे धुमाळ म्हणाले. (Fraud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.