निवडणुकीआधीच Maha Vikas Aghadi मध्ये पडली वादाची ठिणगी, उबाठाने घेतली ताठर भूमिका

108
निवडणुकीआधीच Maha Vikas Aghadi मध्ये पडली वादाची ठिणगी, उबाठाने घेतली ताठर भूमिका
निवडणुकीआधीच Maha Vikas Aghadi मध्ये पडली वादाची ठिणगी, उबाठाने घेतली ताठर भूमिका

मविआच्या (Maha Vikas Aghadi) बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही, अशी भुमिका उबाठा गटाकडून जाहिर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद विकोपाला गेल्याने ठाकरे गटाने ही भुमिका घेतली आहे. ठाकरे गटाच्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आलाय. मात्र यामुळे जागावाटपाचा चर्चा रखडण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेच चर्चेला नसतील तर जागावाटपाची चर्चा होणार नाही.

महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi)जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाताली जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. विदर्भातील जागांमुळे जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमचं ऐकत नाहीत. त्यामुळे नाना पटोलेंच्या भुमिकेबद्दल आम्ही काँग्रेस हायकमांडकडे केल्याचं ही ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुळात आघाडीत मोठा भाऊ कोण यावरून हा वाद सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत ही सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि उबाठा गट समोरासमोर आले होते.

( हेही वाचा : Graphic Designer Salary : मुंबईतील फ्रेशर्स ग्राफिक डिझायनरचे वेतन किती असते?

दरम्यान मविआच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाच्या बैठकीला उबाठा गटाचे अनेक नेते अनुउपस्थित होते. त्यामुळे जागावाटपाचा वाद आणखीन विकोपाला गेला आहे. विदर्भातील ६४ पैकी ९ जागा उबाठा गटाला हव्या आहेत. मात्र नाना पटोलेंकडून फक्त ४ जागा देण्याचे आश्वासन मिळाले आहे. त्यात ४५ जागांवर ही पेच निर्माण झाला आहे. त्यात काँग्रेस हायकमांड डेमेंज कंट्रोलसाठी पुढे सरसावली आहे. त्यात पत्रकार परिषदेत नाना पटोलेंना संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर पटोले पत्रकार परिषदेतून उठून जाताना दिसले. त्यामुळे नाना पटोलेंकडून वादावर चर्चा करण्यास नकार दर्शवण्यास आला.

याप्रकरणी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्य पातळीवर काँग्रेसकडे निर्णयक्षमता नाही. त्यामुळे राहुल गांधीकडे आम्हाला तक्रार करावी लागेल. तसेच बैठकीला नाना पटोले असतील तर बैठकच होणार नाही, अशी भुमिका ही ठाकरे गटाने मांडली. त्यामुळे ठाकरे गटाच्या भुमिकेमुळे मविआच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.