School Van Bus : पुण्यातील शाळा, महाविद्यालयांच्या वाहनांची करावी लागणार ऑनलाईन नोंदणी

104
School Van Bus : पुण्यातील शाळा, महाविद्यालयांच्या वाहनांची करावी लागणार ऑनलाईन नोंदणी

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. लैंगिक शोषण, विनयभंग हे प्रकार सातत्याने घडत आहेत. मागच्याच महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार झाला होता. तर दुसऱ्या घटनेमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं लैंगिक शोषण झालं होतं. (School Van Bus)

(हेही वाचा – निवडणुकीआधीच Maha Vikas Aghadi मध्ये पडली वादाची ठिणगी, उबाठाने घेतली ताठर भूमिका)

अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार होत असल्याने, अशा घटना थांबाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता पुण्यातील शाळा, महाविद्यालयांकडे असलेल्या वाहनांची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पुणे आरटीओ प्रशासन अॅक्शन मोडवर आलेलं आहे.पुण्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल व्हॅन, बसची माहिती आरटीओच्या वेबसाईटवर येत्या १५ दिवसांत भरायची आहे. तसे आदेश पुणे आरटीओने दिले आहेत. ज्या शाळा ही माहिती भरणार नाहीत त्यांना शिक्षण विभागाही नोटीस बजावणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (School Van Bus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.