दिल्लीतील (Delhi) वाढत्या प्रदूषणाचे परिणाम म्हणून दिल्लीतील यमुना नदीही (Yamuna River) प्रदुषित होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून कालिंदी कुंजचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये पाण्यावर बर्फासारखा दिसणारा मात्र प्रदुषणामुळे निर्माण झालेला फेस दिसतो आहे. ज्यामुळे नदीतील (Yamuna River) पाणी संपूर्ण साबणाच्या फेसासारखे दिसत आहे. पुढल्याच महिन्यात नोव्हेंबरमध्ये छठसारखा सण असताना यमुना नदीची (Yamuna River) झालेली दुरावस्था अनेकांची चिंता वाढवणारी आहे. पूर्वांचलमधील लोक मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये राहतात. अशावेळी दिल्ली सरकारनेसुद्धा यावेळी छठ सण खास बनवण्यासाठी विशेष तयारी केली आहे, परंतु प्रदुषणाने दिल्लीकराची पुरती कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Delhi)
समाजमाध्यमांवरील नवीन व्हिडिओमध्ये काय आहे?
यमुना नदीचा (Yamuna River) एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात यमुना नदी (Yamuna River) ही प्रदुषणाने दुषित झाल्याचे स्पष्ट दिसतं आहे. या व्हिडिओमध्ये डोळे पाहू शकतील तेवढ्या दूरदूरवर पांढरा फेस पाहायला मिळतो आहे. सुरुवातील छायाचित्र पाहणाऱ्यांना हे एक बर्फाच्छादित ठिकाण असल्याचा भास होईल. मात्र हे दृश्य दिल्लीमधील (Delhi) कालिंदी कुंजचे आहे. इथल्या प्रदूषणाच्या घटकांमुळे संपूर्ण पाणी विषारी झालं आहे.
Join Our WhatsApp Community