सध्या सणासुदीचे दिवस चालू असून अनेक लोक सोनं- चांदी खरेदी करतात. मात्र गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दसऱ्याच्या वेळी सोन्याचा दर काहीसा कमी झाला होता. मात्र आता दिवाळीपूर्वीच पुन्हा एकदा सोने-चांदीचे भाव गगणाला भिडलेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. (Gold Silver Price)
२४ कॅरेट सोन्याची किंमत(Gold Silver Price)
१ ग्रॅम सोने ७.८९८ रुपयांवर विकले जात आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६३ हजार १८४ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच एका तोळ्याची किंमत ७८ हजार ९८० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Silver Price)
१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,२४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९२० रुपये आहे तर १० ग्रॅम सोने ७२,४०० रुपयांवर विकले जात आहे. १०० ग्रॅम सोने ७,२४,००० रुपयांवर विकले जात आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Silver Price)
१ ग्रॅम सोने ५,९२४ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,३२९ रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,२४० रुपये आहे. १०० ग्रॅम सोने ५,९२,४०० रुपयांवर विकले जात आहे.
चांदीची किंमत (Gold Silver Price)
८ ग्रॅम चांदीची किंमत ७९२ रुपये आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदी ९,९०० रुपयांवर विकली जात आहे. आज चांदीच्या किंमतीत २०० रुपयांनी वाढ झाली आहे.