Assembly Election 2024 : मतदार जागृतीसाठी शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर

130
Assembly Election 2024 : मतदार जागृतीसाठी शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मे महिन्यात तापमान अधिक असल्याने निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून निरंतरपणे मतदार जागृतीसाठी SVEEP (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करावी, यामध्ये शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या आहेत. (Assembly Election 2024)

विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व विभागाचे समन्वय अधिकारी, सहायक समनव्य अधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करून मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात यावा. निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात मतदारांनी सहभागी होण्यासाठी मतदारांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने मतदान केंद्रनिहाय सुक्ष्म नियोजन करा, असे निर्देश संजय यादव यांनी दिले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Baba Siddique यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांना अटक, आता आरोपींची संख्या झाली नऊ)

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात याव्यात, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग व्यवस्था, खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे या सुविधा उपलब्ध करून मतदारांना फार काळ रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही, आणि गर्दी होणार नाही यासाठी टोकन सिस्टीम, कलर कोड अशी व्यवस्था करण्यात यावी. याचबरोबर आरोग्य सुविधा सुद्धा पुरविण्यात याव्यात असेही यादव यांनी यावेळी सांगितले. मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक आहे. याबाबत खासगी संस्था,औद्योगिक संस्था, हॉटेल असोसिएशन यांच्या सोबत चर्चा करावी. तसेच जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. (Assembly Election 2024)

मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे तसेच उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे करावी असेही बैठकीत सांगितले.निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि ८५ वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सध्यास्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी. तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही यादव यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.