Pune Fire News : पुण्यात ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशामक दल घटनास्थळी दाखल 

91
पुण्यात ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशामक दल घटनास्थळी दाखल 
पुण्यात ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशामक दल घटनास्थळी दाखल 

राज्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नवी पेठ (Pune Navi Peth Fire) परिसरातील गांजवे चौक येथे एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या ग्रंथालयाला (Pune Library fire) अचानक आग लागली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. सध्या आग विझवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अग्निशमन दलाकडून या परिसरातील इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आग ग्रंथालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. आगीच्या धुरामुळे परिसरात मोठी गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लवकरच नियंत्रणात येईल, मात्र अजूनही धुराचे लोट दिसत आहेत. 

(हेही वाचा – High Court च्या निकालामुळे दिलासा; जप्त केलेली EVM पुन्हा वापरण्यास परवानगी)

सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, पुणे पालिका (Pune Municipality) प्रशासन संबंधित घटनेवर लक्ष ठेवून आहेत. या आगीच्या घटनेवर अग्निशामन दलाचे नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.      

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.