Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?

266
Aditya Thackeray यांनी एबी फॉर्म दिले, आमदारांनी नाकारले; नक्की काय आहे आमदारांच्या मनात ?
  • प्रतिनिधी

विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाची गुरूवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. उबाठाचे आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उबाठाकडून एबी फॉर्म देण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी या उमेदवारांनी एबी फॉर्म न घेता मातोश्रीवरून काढता पाय घेतला आणि आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ असा संदेश संबंधितांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

मातोश्रीवरील बैठक उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घेतली त्याचं कारण होतं. उद्धव ठाकरे यांची तब्येत ठिक नव्हती. उद्धव ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बैठकीला न येता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बैठक घेतली.

(हेही वाचा – Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळांना मुबलक निधी)

ज्यांना एबी फॉर्म आज घ्यायचे आहेत त्यांनी आज घ्या, ज्यांना नंतर घ्यायचे आहेत त्यांनी नंतर घ्या तेव्हा साहेब असतील असं सांगण्यात आलं. यावेळी एबी फॉर्म देण्यात येत होते. मात्र आमदार आणि उमेदवारांनी आम्ही नंतर एबी फॉर्म घेऊ असं कळवलं.

लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या अनुपस्थित आपण एबी फॉर्म घेऊन जाणं चुकीचं राहील याने उबाठा शिवसैनिकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल. यामुळे कोणत्याच आमदार आणि उमेदवाराने एबी फॉर्म घेतला नाही. दोन दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उमेदवार एबी फॉर्म स्वीकारतील अशी माहिती आहे. (Aditya Thackeray)

(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा मोठा आरोप : म्हणाले, उबाटा गटात तिकीटांसाठी…)

मातोश्रीवर उपस्थित आमदार

आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रमेश कोरगांवकर, सुनील राऊत, राजन साळवी, ऋतुजा लटके, संजय पोतनीस, कैलास पाटील, भास्कर जाधव, शंकरराव गडाख, वैभव नाईक, नितीन देशमुख, राहुल पाटील

आमदारांव्यतिरिक्त कोणते उमेदवार मातोश्रीवर होते

स्नेहल जगताप महाड मतदारसंघ, सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम, अद्वय हिरे मालेगाव बाह्य यांचे नाव आघाडीवर, नितीन सावंत कर्जत मतदारसंघ, अनिल कदम निफाड, मनोहर भोईर उरण विधानसभा

मातोश्रीवर उपस्थिती न राहणाऱ्या आमदारांची कारण अस्पष्ट. अजय चौधरी, उदयसिंग राजपूत, प्रकाश फातर्पेकर.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.