सीएसआर निधीतून महापालिकेच्या सहा रुग्णालयांसह कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट!

वातावरणातील हवा शोषून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

114

मुंबईतील उपनगरीय रुग्णालयांमधील १६ ठिकाणी आणि जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असतानाच चार रुग्णालये व एका कोविड सेंटरमध्ये सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, विलेपार्लेस्थित डॉ. कूपर रुग्णालय आणि वरळीतील नेहरु विज्ञान केंद्र येथील कोविड आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प अर्थात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यासाठी आरती इंडस्ट्रीज, घारडा केमिकल्स, बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमीटेड, सारेक्स फाऊंडेशन, अल्ट्राटेक सिमेंट लिमीटेड, डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा.लि. आणि मारवाह स्टील प्रा. लिमीटेड या सात कंपन्यांनी महानगरपालिकेला सहकार्य केले आहे.

(हेही वाचा : आता स्वत:च्याच मंत्र्यांवर शिवसेना आमदार नाराज!)

प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले!

वातावरणातील हवा शोषून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादीत होणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे शुक्रवारी करण्यात आले. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून या सात दात्यांनी हे प्लांट महानगरपालिकेला तातडीने उपलब्ध करुन दिले आहेत. या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यास राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, ‘जी/दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) कृष्णा पेरेकर, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.