Assembly Election 2024 : चेंबूर विधानसभेसाठी शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच स्पर्धा

105
Assembly Election 2024 : चेंबूर विधानसभेसाठी शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच स्पर्धा
  • सचिन धानजी, मुंबई

दक्षिण मध्य मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेच्या माजी खासदार आणि माजी आमदारांमध्येच चढाओढ सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले राहुल शेवाळे हे चेंबूर विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून याच मतदार संघातून माजी आमदार तुकाराम कातेही हेही इच्छुक आहेत. त्यामुळे चेंबूर विधानसभेत शेवाळे की काते असा पेच पक्षापुढे निर्माण झाला आहे. (Assembly Election 2024)

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी पराभव केला. त्यामुळे शेवाळे यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत असून यासाठी त्यांनी चेंबूर विधानसभेची निवड केल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अणुशक्ती नगर विधानसभेतून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते हेही चेंबूरमधूनच इच्छुक आहेत. चेंबूर विधानसभेच्या जागेवरून काते विरुद्ध शेवाळे यांच्यात चांगली स्पर्धा रंगलेली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Sharad Pawar मराठा आरक्षणासाठी जबाबदार; खासदार उदयनराजे भोसले यांचा आरोप)

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार तुकाराम काते आणि माजी नगरसेविका समृध्दी काते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राहुल शेवाळे हे खासदार बनल्यानंतर चेंबूर विधानसभेतून निवडणूक लढवण्याच्या हेतूनेच काते यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे काते यांनी चेंबूर विधानसभेवर दावा ठोकला असून हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्यानेच शेवाळे यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली असल्याची माहिती मिळत आहे. (Assembly Election 2024)

अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रातून तुकाराम काते हे २०१४ मध्ये निवडून आले होते. त्यांनी नबाव मलिक यांचा पराभव केला होता, परंतु स २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नबाव मलिक यांनी काते यांचा पराभव केला. सन २०१९मध्ये मलिक हे ६५ हजार २१७ मते मिळाली होती, तर काते यांना ५२ हजार ४६६ मते मिळाली होती. या मतदार संघातून आपल्याला निवडून येणे शक्य नसल्यानेच काते यांनी चेंबूर विधानसभेची निवड केली आहे. दरम्यान, अणुशक्तीनगर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सना खान तर मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिक यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंच्या घरावर ड्रोन हल्ला)

अणुशक्ती नगर विधानसभा

अनिल देसाई : ७९७६७, राहुल शेवाळे : ५०६८४

महाविकास आघाडीचे मताधिक्य : २९०८३ मते

चेंबूर विधानसभा

अनिल देसाई : ६१३५५, राहुल शेवाळे : ५८४७७

महाविकास आघाडीचे मताधिक्य : ०२८७८ मते

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.