महाराष्ट्र विधानसभा निवडणुीकीचे बिगूल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जागावाटपाच्या चर्चेनंतर दि. १९ ऑक्टोबर रोजी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा एकदा निमत्रंण दिलेले आहे. त्यामुळे लवकरच कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जायला आवडेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांना दिली आहे. याआधी शिवसेनेतील बंडानंतर आणि सत्तास्थापनेनंतर शिंदे आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. आता ते उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील, असे संकेत त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिले.
( हेही वाचा : Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला यावं यासाठी पाकचा नवीन प्रस्ताव)
ते पुढे म्हणाले, लाडकी बहिण योजनेला आचारसंहितेमुळे ब्रेक लागणार अशी सर्वत्र चर्चा आहे. मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही ऑक्टोबर महिन्यातच पैसे जमा केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदात साजरी होईल. तसेच आम्ही विकासाला महत्त्व देतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली असून जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. एक टीम म्हणून आम्ही काम करतोय, महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे, असा विश्वास ही यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर एक दोन दिवसात जागावाटपाची यादी जाहीर होईल, असे ही शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community