- प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जवळपास २५० जागांवर सकारात्मक चर्चा झाली असून ३०-३५ जागांचा तिढा कायम आहे. तो लवकरच सोडविला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असून येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जाईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Mahayuti)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : चेंबूर विधानसभेसाठी शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्येच स्पर्धा)
गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा केली. उभय नेत्यांमधील ही बैठक तब्बल अडीच तास चालली होती. दरम्यान, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा केला. शुक्रवारच्या बैठकीत जागावाटपाच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. जवळपास २५० पेक्षा जास्त जागांवर एकमत झाले असून ३०-३५ जागांचा तिढा एक-दोन दिवसांत सोडविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Mahayuti)
(हेही वाचा – Jharkhand च्या पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले, निवडणुक आयोगाचा निर्णय)
भाजपा दीडशेपेक्षा जास्त जागा लढविण्यावर ठाम आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी ८०-८५ जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४०-४५ जागा सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीचे दर्शन घेण्यास जाणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आपल्याला दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. अशात, देवीचे दर्शन घ्यायला आपल्याला आवडेल असे शिंदे म्हणाले. (Mahayuti)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community