मनोज जरांगे (Jarange) पाटलांनी सुरु केलेले आंदोलन गरजवंतांचे आंदोलन, गोदापट्ट्यातील लोकांना न्याय देण्याचे आंदोलन म्हणून सुरु झाले. मात्र आता गरजवंत मराठा समाजासाठी सुरू केलेले आरक्षण आंदोलन आता एका राजकीय टप्प्यावर आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) प्रचार करत त्यांना मदत केली. त्यानंतर सहा महिन्यात यात सुधारणा होईल, असे वाटले होते. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये ही जरांगे (Jarange) पाटील निवडणूक न लढवता ते महाविकास आघाडीला पाठिंबा देतील, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी लगावला आहे.
(हेही वाचा : मुस्लिम नेत्यांचा Vote Jihad चा ऐलान; महायुतीविरोधात ठाकरे गटाचे षडयंत्र? भाजपाचा आरोप )
हाके पुढे म्हणाले, जरांगे (Jarange) पाटलांना आरक्षणाचा विषयच कळलेला नाही. यामुळे ईडब्लूएस सारखे आरक्षण मराठा बांधवांच्या हातून निघून गेले आहे. त्यामुळे मराठा बांधवांचे नुकसान होत आहे. जरांगेंना (Jarange) आरक्षणाचे काहीही पडलेले नाही, त्यांना फक्त राजकारण आणि निवडणुका याशिवाय काहीच दिसत नाहीत.त्यामुळे जरांगेंनी कितीही बैठका घेतल्या तरी ते निवडणुकीला उभे राहणार नाहीत. तसेच ओबीसी बचाव ही आमची भुमिका आहे. मात्र ज्या ज्या आमदारांनी किंवा पक्षांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाला बगल दिली. त्यांना आम्ही सत्तेतून पायउतार करणार आहोत. कारण यांच्या खासदारकीचे आणि आमदारकीचे मार्ग ओबीसींच्या वाड्यावस्त्यांवरून जातात. त्यामुळे ‘जो ओबीसी हित की बात करेगा, वहीं महाराष्ट्र विधानसभा में चुनके जायेंगा’, असे ही हाके (Laxman hake) म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community