Assembly Election : आचारसंहितेच्या दोन दिवसांतच ४२० तक्रारी; १०६४ लाखांची मालमत्ता जप्त; बेकायदा पैसे, मद्य, ड्रग्ज जप्त

58
Assembly Election : आचारसंहितेच्या दोन दिवसांतच ४२० तक्रारी; १०६४ लाखांची मालमत्ता जप्त; बेकायदा पैसे, मद्य, ड्रग्ज जप्त
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहितेच्या कालावधीत गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. गेल्या चार दिवसांत बेकायदा पैसे, मद्य ड्रग्ज आदी साहित्य जप्त करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर १,७५२ आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना नोटीस बजावल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. (Assembly Election)

(हेही वाचा – Jarange निवडणूक लढवू शकत नाहीत, ते तर मविआचे पाठीराखे; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचार संहिता लागू झाली आहे. आचार संहितेच्या कालावधीत उल्लंघन करणे महागात पडले आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिज ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. दुसरीकडे विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १,०६४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – निवडणुकीआधी CM Eknath Shinde उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार)

आक्षेपार्ह पोस्ट केलेल्यांना नोटीस

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सोशल मिडीयावर निवडणुकीशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट/व्हिडोओवर संबंधित सोशल मिडीयाचे प्लॅटफॉर्मचे नोडल ऑफिसर यांना कलम ७९(३) (b) अन्वये टेक डाउन करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (Assembly Election)

इंटरमिडीया  आक्षेपार्ह पोस्ट डिलीट पेडिंग
फेसबुक  १४३  १६   १२७
इंस्टाग्राम  २८०   २९ २५१
ट्विटर  १२९६  २५१ १०४५
युट्यूब ३१ ०५  २६
अन्य   ०२  ०२  ००

 

आक्षेपार्ह पोस्ट एकूण डिलीट पेडिंग
१७५२ ३०३ १४४९

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.