स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांना सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये सात्यकी सावरकरांनी सांगितले आहे की, कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी १५ दिवसांच्या आत जाहिरपणे क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल, असा इशारा ही सावरकर यांनी दिला आहे. त्यामुळे गुंडू राव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Veer Savarkar)
( हेही वाचा : Jarange निवडणूक लढवू शकत नाहीत, ते तर मविआचे पाठीराखे; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. ते गोमांस खायचे. त्यांचे विचार मूलतत्त्ववादी होते’, असे अवमानकारक वक्तव्य कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी केले होते. तसेच सावरकर (Veer Savarkar) यांची तुलना महात्मा गांधी आणि महंमद अली जिना यांच्याशी केली होती. त्यांच्या या दायित्वशून्य आणि निराधार वक्तव्यामुळे सावरकर यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्याविरोधात सावरकरप्रेमींनी (Veer Savarkar) संताप व्यक्त केला होता. गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी केलेले विधान त्यांचे व्यक्तीगत आहे का ? तसेच संबंधित वक्तव्य आणि विचार ही काँग्रेसची भूमिका आहे का ? यांचाही खुलासा करावा, असेही सावरकर (Veer Savarkar) यांनी गुंडू राव यांना दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community