Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती

172
Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीरनामा समिती
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी निवडणुकीसाठी पक्षाची स्वतंत्र जाहीरनामा समिती घोषित केली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीत १७ सदस्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Jarange निवडणूक लढवू शकत नाहीत, ते तर मविआचे पाठीराखे; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र)

पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) जनतेला पुढील पाच वर्षांसाठी कोणती आश्वासने द्यायची यावर ही समिती विचार करणार आहे. त्यानंतर समितीच्या सूचनांचा पक्षाचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – निवडणुकीआधी CM Eknath Shinde उमेदवारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार)

हे आहेत जाहीरनामा समितीचे सदस्य

कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, आमदार इद्रिस नायकवडी, अविनाश आदिक, रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे पाटील, सूरज चव्हाण, नजीब मुल्ला, कल्याण आखाडे, सुनील मगरे, संजय मिस्किन, आनंद परांजपे हे जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. तर आमदार शिवाजीराव गर्जे हे समितीचे निमंत्रक आहेत.  (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.