कोरोना काळातील ‘देवदूत’ प्रशांत कारुळकर यांचा जागतिक सन्मान!

173

कोविड-१९ महामारीमुळे अवघ्या मानवजातीचे आयुष्य कष्टमय बनले आहे. या महामारीमध्ये कोरोना वॉरियर्स म्हणून डॉक्टरांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून लाखो जणांचे प्राण वाचवले आहेत, परंतु या महामारीने समाजाला केवळ संसर्गाने वेढले नाही, तर लॉकडाऊन सारख्या भयंकर संकटाने लोकांवर उपासमारीची वेळ आणली. अशा कठीण काळात औषधे, अर्थ साहाय्य, अन्नधान्याची मदत, रुग्णांना रुग्णालयात भरती करणे, ऑक्सिजन पुरवठा करणे इत्यादी स्वरूपाची मदत करणारेही देवदूत ठरले. अशा देवदूतांमध्ये प्रशांत कारुळकर यांच्या ‘कारुळकर प्रतिष्ठान’चा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या या समाजकार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव करून सन्मान करण्यात आला.

प्रशांत कारुळकर यांच्या द्वारे स्थापन करण्यात आलेल्या कारुळकर प्रतिष्ठानने कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन, साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री आणि इंडो-युके कल्चरल फोरम या आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन महत्वाच्या संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. कारुळकर प्रतिष्ठान यांना ज्या वर्ल्ड बुक ऑफ रिकार्ड्स – लंडन यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले, त्या पुरस्काराने आतापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, बिहार सरकारचे मंत्री शाहनवाज हुसेन इत्यादींना गौरविण्यात आले आहे. याशिवाय साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देऊन प्रशांत कारुळकर यांचा सन्मान करण्यात आला. अशाच प्रकारे इंडो-युके कल्चरल फोरम हा पुरस्कार दोन्ही देशांचे प्रतीक आहे. दोन्ही देशांमध्ये विशिष्ट कार्य करणाऱ्या प्रतिभाशाली व्यक्तिमत्वांनाच हा पुरस्कार दिला जातो.

(हेही वाचा : कारूळकर प्रतिष्ठान निलेश तेलगडेंच्या कुटुंबासाठी बनले आधार!)

Kurulkar 1

‘जिथे आवश्यकता तिथे सेवा’

प्रशांत कारुळकर आणि शीतल कारुळकर यांची ‘कारुळकर प्रतिष्ठान’ संस्था ग्रामीण भागातील गरजवंतांना जेवण, औषधे तसेच असाध्य रोग जडलेल्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देते. त्यांचे हे सेवाकार्य देशभरात चालले आहे, मात्र महाराष्ट्रात डहाणू, उमरगाव आणि तलासरी येथील आदिवासी भागातही त्यांनी केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधी कोणताही कामगार, प्रवासी, आदिवासी आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी यांना अन्नपाणी, औषधे आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, याकरता आमचे प्रयत्न असणार आहेत.
– प्रशांत कारुळकर, संस्थापक – कारुळकर प्रतिष्ठान

कारुळकर प्रतिष्ठानने कोरोनाच्या उपचारांसाठी २५ लाख रुपयांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १२ रुग्णवाहिका, अन्नधान्य, जीवरक्षक औषधे उपलब्ध करून दिले. जिल्हा रुग्णालयांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर आणि व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून दिले. याशिवाय या कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत १० लाख रुपयांचे पीपीई किटचे वितरण केले. या अशा सामाजिक कार्यात कारुळकर प्रतिष्ठानचा सिद्धांत आहे ‘जिथे आवश्यकता तिथे सेवा’!

(हेही वाचा : वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्त्व मिळवणारे ‘हे’ पहिले भारतीय दांपत्य)

Kurulkar 2 1

‘प्रत्येकाच्या मुखावर हास्य’

कारुळकर प्रतिष्ठानचे प्रशांत कारुळकर आणि शीतल कारुळकर यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरूच ठेवले. या सेवाकार्यात त्यांचा एकच मंत्र होता ‘प्रत्येकाच्या मुखावर हास्य असावे’! या समाजसेवेच्या अंतर्गत प्रतिष्ठानने ग्रामीण भागाकडेही विषेश लक्ष दिले. त्यामध्ये कोरोना चाचण्या, औषधे, १५०० हुन अधिक ऑक्सिजन सिलिंडर आणि रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध करू दिले. त्यांच्या याच सेवाभावामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही प्रतिष्ठानचा सन्मान केला. त्यांना ‘कोरोना देवदूत’चे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.