Nanded मध्ये कट्टरपंथींकडून महादेव मंदिराची विटंबना

176
Nanded मध्ये कट्टरपंथींकडून महादेव मंदिराची विटंबना
Nanded मध्ये कट्टरपंथींकडून महादेव मंदिराची विटंबना

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगावमध्ये इस्लामिक कट्टरपंथींनी हिंदू मंदिराची विटंबना केल्याची घटना घडली आहे. हदगावमधील महादेव मंदिर संस्थाव, गणपती मंदिरावर दगडफेक त्यासोबतच मंदिरावर चप्पला फेकून मारण्याचा प्रकारही कट्टरपंथींनी केला. या प्रकरणी ३४ कट्टरपंथींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

( हेही वाचा : Assembly Election 2024 : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास बजावणार नोटीस

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संदल मिरवणुकीत धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी डीजेवर वाजवली जात होती. मिरवणूक गावातील महादेव मंदिर संस्थान समोर येताच जमाव आक्रमक झाला. पोलिसांनी यावेळी डिजे बंद करायला लावला म्हणून जमावाने विरोधात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.(Nanded)

याप्रकरणी शिवचैतन्य शिवाचार्य महाराज म्हणाले की, कट्टरपंथी जमावातील एकाने हिंदू महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात कट्टरपंथींनी महादेव मंदिरातील सीसीटिव्ही विरुद्ध दिशेला फिरवून दगडफेक आणि अश्लील हातवारे केले. ज्यामुळे त्यांच्या कृत्याची माहिती कुणालाही कळू नये. त्याचवेळी मंदिराशेजारील अशोक कुटे यांच्या घराच्या पत्र्यावरून एका कट्टरपंथींने घरात उडी मारुन घरातील एकट्या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. (Nanded)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.