J. J. Shootout प्रकरणातील आरोपी त्रिभुवन सिंगला ३२ वर्षांनी अटक; दाऊद टोळीने दिली होती सुपारी

143
J. J. Shootout प्रकरणातील आरोपी त्रिभुवन सिंगला ३२ वर्षांनी अटक; दाऊद टोळीने दिली होती सुपारी
J. J. Shootout प्रकरणातील आरोपी त्रिभुवन सिंगला ३२ वर्षांनी अटक; दाऊद टोळीने दिली होती सुपारी
सर जे. जे रुगणालयात १९९२ साली झालेल्या शूटआऊट प्रकरणातील फरार आरोपी त्रिभुवन रामपती सिंग उर्फ श्रीकांत राय रामपती उर्फ प्रधान (६२) याला तब्बल ३२ वर्षांनी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.उत्तर प्रदेशातील मिर्झापुर तुरुंगात असलेल्या त्रिभुवन रामपती सिंग याला प्रोडक्शन वॉरंट वर शुक्रवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. शनिवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २५ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्रिभुवन सिंग हा सुभाषसिंग ठाकूर टोळीचा गुंड आहे. (J. J. Shootout)
मुंबईतील सर, जे.जे.रुग्णालयात १९९२ साली  गोळीबाराची घटना घडली होती, या गोळीबारात अरुण गवळी टोळीचे गुंड शैलेश हळदणकर (Shailesh Haldankar) आणि बिपीन शेर (Bipin Sher) सह दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. जेजे रुग्णालयात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रथमच एके ४७ रायफल,अत्याधुनिक पिस्तुल हात बॉम्बचा वापर करण्यात आला होता. हा गोळीबार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर, ब्रिजेश सिंग आणि इतर गुंडांनी केला होता. (J. J. Shootout)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची बहीण हसीना पारकर (Haseena Parkar) हिचे पती इब्राहिम पारकर (Ibrahim Parker) उर्फ लंबू याची हत्या अरुण गवळी टोळीच्या शैलेश हळदणकर आणि बिपीन शेर यांनी केली होती, या हत्येनंतर पळून जात असताना दोघेही जखमी झाले होते, आणि दोघाना जखमी अवस्थेत मुंबई पोलिसांनी अटक करून त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिमने मेव्हूण्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी  सुभाषसिंग ठाकूरच्या माध्यमातून जे.जे.हत्याकांड घडवून आणले होते. जे.जे.हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुभाषसिंग ठाकूरसह जवळपास ३० जणांना अटक करण्यात आली होती. (J. J. Shootout)
जेजे हत्याकांडात उत्तर प्रदेश मिर्झापुर येथील त्रिभुवन सिंग याचची महत्वाची भूमिका होती, या हत्याकांडात त्रिभुवन सिंगच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता, जखमी अवस्थेत देखील त्रिभुवन हा फरार होण्यास यशस्वी झाला होता. मुंबई पोलिसांना त्रिभुवनची ओळख न पटल्यामुळे तो अनेक वर्षे श्रीकांत राय रामपती उर्फ प्रधान या खोट्या नावाने वावरत होता. जेजे हत्याकांडात पायाला गोळी लागलेला आणि मागील ३२ वर्षांपासून मुंबई पोलिसांना पाहिजे असणारा आरोपी त्रिभुवन सिंग हा मिर्झापुरच्या तुरुंगात एका गुन्ह्यात असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली असता गुन्हे शाखेने  त्याच्या अटकेसाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष टाडा न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट घेण्यात आले, प्रोडक्शन वॉरंटवर शुक्रवारी त्रिभुवन रामपती सिंग उर्फ श्रीकांत राय रामपती उर्फ प्रधान (६२) याला मिर्झापुर तुरुंगातुन ताब्यात घेऊन मुंबईतील किल्ला न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले होते असता न्यायालयाने २५ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. (J. J. Shootout)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.