-
ऋजुता लुकतुके
मॉरिस गराज ही कंपनी सध्या भारतात विस्ताराच्या प्रयत्नांत आहे. आणि ते करताना कंपनी आपल्या महत्त्वाकांक्षी दोन गाड्या भारतात आणणार आहे. एमजी ग्लॉस्टर गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येईल, ज्यात इंजिन जुनचं असेल. पण, आतून आणि बाहेरून गाडीचं रुपडं बदललेलं असेल. तर क्लाऊड ईव्ही ही कंपनीची नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीही लोकांसमोर पहिल्यांदा आणली जाईल. दोघांपैकी ग्लॉस्टर ही गाडीची चाचणी भारतीय रस्त्यांवर गेले काही महिने सुरू आहे. त्यामुळे लाँचही जवळ आल्याचं स्पष्ट दिसतंय. (MG Gloster 2024)
(हेही वाचा- भारताला पुन्हा सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी अध्यात्माची शक्ती आवश्यक; केंद्रीय मंत्री Shripad Naik यांचे विधान)
ग्लॉस्टर गाडीच्या इंजिनात कुठलाही बदल झालेला नाही. पण, गाडीचा लुक आतून आणि बाहेरून बदलण्यात आला आहे. अर्थातच, आधीपेक्षा आधुनिक आणि आक्रमक डिझाईनचा कंपनीचा प्रयत्न आहे. गाडीचं पुढचं ग्रिल आणि आकारही आधुनिक आणि तरुणांना आवडेल असा आहे. हेडलाईट आता एलईडी आहेत. त्यांचंही डिझाईन बदललं आहे. समोर आणि मागेही एलईडी दिव्यांची एक माळ हेडलाईट आणि टेललाईटमध्ये मिसळते. गाडीचा बाहेरचा चेहरा हा अनेक चाचण्यांमधून समोर आला आहे. (MG Gloster 2024)
MG Gloster Facelift 2024: Expected in Nov 2024, The India-spec Gloster will essentially be mechanically same as the existing one, and will come with an all-new design inside-out. pic.twitter.com/r0kGDXURR3
— Spinny (@myspinny) October 18, 2024
ही गाडी आतून नेमकी कशी आहे याचं दर्शन अजून लोकांना झालेलं नाही. पण, आधुनिक आणि अद्ययावत एसयुव्ही आहे म्हटल्यावर इन्फोटेनमेंट डिस्प्लेसह इतर आधुनिक फिचरही असणार हे नक्की आहे. तुमचा अँड्रॉईड किंवा ॲपल फोनही तुम्ही या यंत्रणेला जोडू शकणार आहात. शिवाय तुमचा फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला वायरलेस चार्जिंग किटही मिळणार आहे. गाडीला पॅनोरमिक सनरूफ असेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालकाला एडीएएस ही यंत्रणाही देण्यात आली आहे. शिवाय पार्किंगसाठी ३६० अंश कोनांतून पाहता येतील असे कॅमेरे पुढे बसवलेले असतील. (MG Gloster 2024)
(हेही वाचा- J. J. Shootout प्रकरणातील आरोपी त्रिभुवन सिंगला ३२ वर्षांनी अटक; दाऊद टोळीने दिली होती सुपारी)
बाकी गाडीचं इंजिन जुनंच म्हणजे २.० टर्बो डिझेल आणि पेट्रोलचं असेल. त्यात ८ स्पीड गिअरबॉक्स असेल. हे इंजिन २१३ बीएचपी क्षमतेचं असेल. ४७८ एनएमचा टॉर्क असेल. हीच गाडी पुढे जाऊन इलेक्ट्रिक प्रकारातही कंपनी आणू शकते. या गाडीची सुरुवातीची किंमत ३८.८ लाख रुपये इतकी आहे. आणि मॉडेलनुरुप ती ४३ लाखांपर्यंत जाऊ शकते. (MG Gloster 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community