-
ऋजुता लुकतुके
युनायडेट फॉस्फसर लिमिटेड ही देशातील सुरुवातीच्या काही बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे. पंजाबचे रजनीकांत श्रॉफ यांनी ५५ वर्षांपूर्वी १९६९ मध्ये या कंपनीची स्थापना केली. शेतीसाठी लागणारी रसायनं म्हणजेच खतं बनवणं आणि त्याचबरोबर इतर रसायनं बनवणं हे मुख्य उद्दिष्ट होतं. रजनीकांत श्रॉफ स्वत: कंपनीत कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा जयदेव श्रॉफ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. राष्ट्रीय शेअर बाजार आणि बाँबे स्टॉक एक्सचेंज या दोन्ही शेअर बाजारांची स्थापना झाल्यापासून या कंपनीचा शेअर दोन्ही बाजारांमध्ये नोंदणीकृत आहे. (UPL Limited Share Price)
(हेही वाचा- Ghatkopar hoarding case मधील आरोपी भावेश भिंडेला जामीन मंजूर!)
२०१९ मध्ये कंपनीने एरिस्टा लाईफसायन्सेस ही कंपनी अधिग्रहित केली आहे. ४.२ अब्ज अमेरिकन डॉलरचा हा व्यवहार होता. त्यानंतर युनायटेड फॉस्फरस लिमिटेड ही कंपनी जगातील पाचवी मोठी जनरिक रसायनं बनवणारी कंपनी बनली आहे. या श्रेणीत ते बायर आणि बीएएसएफच्या मागे आहेत. (UPL Limited Share Price)
कंपनीच्या कामगिरीचा थेट परिणाम शेअरवर आतापर्यंत झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात हा शेअर ५५७ वर ट्रेड करत आहे. (UPL Limited Share Price)
वर म्हटल्या प्रमाणे कंपनीचा सगळा भर कृषी क्षेत्रात लागणारी खतं आणि रसायनांवर आहे. गेल्यावर्षी अनियमित पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर कंपनीचे शेअरही २०२३ मध्ये याच सुमारास १० टक्के खाली आले होते. पण, यंदा परिस्थिती वेगळी आहे. पाऊस चांगला झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे. त्यातच रबी हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे रसायनं, किटकनाशकं आणि खतांचा वापर वाढणार आहे. त्याचा फायदा या कंपनीच्या शेअरनाही होऊ शकतो. (UPL Limited Share Price)
(हेही वाचा- Apollo Pharmacy : आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सुरू केली हॉस्पिटल साखळी)
शिवाय युपीएल कंपनीची मोठी गुंतवणूक एडवांटा एंटरप्रायझेस या कंपनीत आहे. या कंपनीची ८७ टक्के भागिदारी युपीएलकडे आहे. या कंपनीची कामगिरी चांगली आहे. आणि त्यातूनही कंपनीला चांगला नफा मिळणार आहे. (UPL Limited Share Price)
शिवाय युपीएल कंपनी येत्या दिवसांमध्ये ४,००० कोटी रुपयांचा राईट्स इश्यू बाजारात आणण्याच्या विचारात आहे. त्यातूनही कंपनीचं उत्पन्न वाढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं मूल्य ४ अब्ज अमेरिकन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. (UPL Limited Share Price)
(हेही वाचा- कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच चौकशी करावी; ED ने काढले परिपत्रक)
या गोष्टींमुळे विविध संशोधन संस्थाही या शेअरवर सकारात्मक आहेत. मोतीलाल ओस्वाल, प्रभूदास लिलाधर या संश्थांनी मात्र युपीएलवर विक्रीचा सल्ला दिला आहे. तर जिओजीत पारिबासने खरेदीचा सल्ला दिला आहे. (UPL Limited Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरवर खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणूक स्वत;च्या जोखमीवर आणि जाणकारांच्या सल्ल्याने करावी)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community